सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

जिल्ह्यात २१४ कोरोना बाधित पैकी पाच व्यक्तींचे निधन झाले आहे...

ओरोस - सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी गेला आहे. कणकवली तालुक्यातील एका 60 वर्षीय पुरुषाचे कोरोनामुळे मंगळवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात निधन झाले आहे. 20 जून पासून ते उपचार घेत होते. त्यांचा पहिला नमूना निगेटिव्ह आला होता. तर दूसरा नमूना पॉझिटिव्ह आला होता. 10 दिवस ते व्हेन्टीलेटरवर होते. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी ठरला आहे. त्यामुळे जिल्ह्यात २१४ कोरोना बाधित पैकी पाच व्यक्तींचे निधन झाले आहे. १५२ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. एक रुग्ण मुंबई येथे गेला आहे. त्यामुळे ५६ रुग्ण सक्रीय राहिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona death in sindhudurg is five