शृंगारतळीतील संचारबंदी अधिक कडक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

शृंगारतळीमधील संचारबंदी आज अधिक कडक केली आहे. शृंगारतळी गावात येणारे सहा रस्ते बॅरिकेटस्‌ घालून अडविले आहेत. केवळ शृंगारतळीत राहणाऱ्या व्यक्तीलाच चौकशी करून गावात सोडण्यात येत आहे.

गुहागर ( रत्नागिरी) - शृंगारतळीमधील संचारबंदी आज अधिक कडक केली आहे. शृंगारतळी गावात येणारे सहा रस्ते बॅरिकेटस्‌ घालून अडविले आहेत. केवळ शृंगारतळीत राहणाऱ्या व्यक्तीलाच चौकशी करून गावात सोडण्यात येत आहे. गुहागर पोलिसांच्या मदतीला जिल्ह्यातील अन्य पोलिस ठाण्यातील 39 पोलिस पाठविले आहे. 

शृंगारतळी रोशन मोहल्ल्यातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. ही व्यक्ती शृंगारतळी परिसरात फिरली होती. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढू नये म्हणून गुरुवारपासून (ता. 19) शृंगारतळी गावात संचारबंदी लागू केली; मात्र तालुक्‍यातील ग्रामस्थांना याची माहिती नसल्याने गुरुवारी संचारबंदीची अंमलबजावणी थोडी शिथिल होती. शुक्रवारी (ता.20) संचारबंदी अधिक कडक केली आहे.

गुहागरातून शृंगारतळीमार्गे जाणारी एकही एसटी शृंगारतळीत थांबत नाही. खासगी वाहनांनादेखील शृंगारतळीत येण्यासाठी बंदी केली आहे. त्यासाठी वेळंब फाटा, जानवळे फाटा, पालपेणे फाटा, गुहागरकडे जाणारा रस्ता, चिपळूणकडे जाणारा रस्ता, कौंढर फाटा या ठिकाणी अडथळे उभे केले आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणचे 39 कर्मचारी संचारबंदीच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी गुहागर पोलिसांना मदत करत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Effect Curfew In Shrungartali Ratnagiri Marathi News

टॅग्स
टॉपिकस