esakal | समुद्रावर स्वार होण्यासाठी सावकारांकडे हात पसरायची आलीय वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

waiting for speed boat fishermen use one boat for 16000 for paper boat today in ratnagiri

समुद्रावर स्वार होण्यासाठी सावकारांकडे हात पसरायची आलीय वेळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : बंदी कालावधी संपुष्टात आला असला तरीही मागील सलग दोन हंगामात कोरोना (Corona) आणि वादळांमुळे अनेक मच्छीमार (Fishermen) अजूनही सावरलेले नाहीत. यंदा नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान दोन ते अडीच लाख रोकड गरजेची आहे. आधीच्या कर्जांचे हप्ते थकल्यामुळे बँकांकडून नव्याने कर्ज मिळणे दुरापास्त आहे. या परिस्थितीत मच्छीमारांना नौका दुरुस्तींसह समुद्रावर स्वार होण्यासाठी सावकारांकडे हात पसरायची वेळ येणार आहे.(Corona-exhausted-Fishermen-financial-destroy-konkan-news-akb84)

जिल्ह्यातील हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहे. छोट्या-मोठ्या मिळून तीन हजारांहून अधिक नौका आहेत. मार्च २०२० मध्ये कोरोनाने थैमान घातल्यामुळे मच्छीमारीवर परिणाम झाला आहे. अनधिकृत मासेमारी, परप्रांतियांचे आव्हान यामध्ये स्थानिक मच्छीमार गेली काही वर्षे पिचलेला आहे. गेले दोन महिने शासनाच्या निर्देशाप्रमाणे मासेमारी बंद होती. शनिवारी (ता. ३१) बंदी कालावधीत संपुष्टात येत आहे. १ ऑगस्टपासून मच्छीमारी सुरू होईल; परंतु वातावरण बिघडल्यामुळे एखाद टक्का मच्छीमार समुद्रात जातील, असा अंदाज आहे. मागील दोन हंगामात मच्छीमारांची गैरसोय झाली होती.

शासनाकडून मागील तीन वर्षांचा डिझेल परतावाही थकवलेला आहे. सुमारे ४८ कोटी रुपये जिल्ह्यातील मच्छीमारांना मिळणे बाकी आहेत. हे पैसे मिळाले असते तर त्याचा फायदा यंदाचा हंगाम सुरू करण्यासाठी झाला असता. गतवर्षी केंद्रशासनाकडून आत्मनिर्भर होण्यासाठी नाबार्डच्या सूचनेनुसार कर्ज घेतलेल्या मच्छीमारांना एक लाख ६० हजार रुपये खेळते भांडवल उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. त्याचा काही मच्छीमारांनी लाभ घेत व्यावसाय सुरू केला. यंदा अजूनही याबाबत कार्यवाही झालेली नाही.

हेही वाचा: कळणेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर; नदी प्रदूषित

मासेमारी सुरू करण्यासाठी प्रत्येक नौकेवर खलाशांची गरज असते. त्यांना आणण्यापूर्वी ''अ‍ॅडव्हान्स'' द्यावा लागतो. त्यासाठी दीड ते दोन लाख रुपये लागतात. नौका दुरुस्तीसाठी ७० हजार ते १ लाख रुपये तर डिझेल, बर्फ, रेशनसाठी ६० हजार रुपये खर्च येतो. सर्व मिळून तीन लाखावर खर्च जातो. या पैशांची जुळवाजुळव करताना मच्छीमारांना सध्या कसतर करावी लागत आहे. बँकाकडे आधीच कर्ज उचललेले असल्यामुळे मच्छीमारांना सावकारीकडे वळावे लागते. दरवर्षी साठ टक्के मच्छीमार सावकारांकडून कर्ज घेत असल्याचा अंदाज आहे. त्यात यंदा थोडी वाढ होण्याची शक्यता मच्छीमारांनी व्यक्त केली आहे.

मच्छीमारी सुरू करायला व्याजाने किंवा उधार पैसे घ्यावे लागतात. सावकारी कर्ज काढले तर महिन्याला ते फेडावेच लागते. सध्या मच्छीमार व्यवसाय बेभरवशी झाला आहे. शासनाकडून परतावा मिळाला असता तर त्यामधून खर्च करता आला असता. काही मच्छीमारांना दागिने गहाण ठेवण्याची वेळ आली आहे.

- आप्पा वांदरकर, मच्छीमार नेते

loading image
go to top