सिंधुदुर्ग प्रशासन एका गोष्टीतून चिंतामुक्त

corona impact konkan sindhudurg
corona impact konkan sindhudurg
Updated on: 

ओरोस (सिंधुदुर्ग) -  दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात झालेल्या तबलिगी जमात धार्मिक कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील 2 व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. या दोन्ही व्यक्तींना विलगीकरण कक्षामध्ये दाखल करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठविले होते. या दोन्ही व्यक्तींच्या नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अन्य प्रलंबित चार व्यक्तींचे नमुने अहवाल प्राप्त झाले असून ते सुद्धा निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील एकाही व्यक्तीचा कोरोना अहवाल प्रलंबित नाही. 

जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये सध्या 19 रुग्ण दाखल आहे. आतापर्यंत 56 नमुने तपासणीसाठी पाठविले असून सर्व नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यापैकी 55 नमुने निगेटिव्ह व 1 नमुना पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील नमुने तपासणीसाठी एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात येत होते; पण आता हे नमुने व्हीडीआरएल, मिरज येथे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे अहवाल लवकर प्राप्त होतील. 

जिल्ह्यात एकूण 366 व्यक्तीचे घरीच अलगीकरण करण्यात आले असून 50 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरण कक्षामध्ये आहेत. 28 दिवस अलगीकरण केलेल्या व्यक्तींची संख्या 46 इतकी आहे. जिल्ह्यातील ज्या व्यक्तींनी त्यांच्या कामासाठी नवी दिल्लीला प्रवास केला आहे अशा व्यक्तींना खबरदारीचा उपाय म्हणून अलगीकरण कक्षात दाखल केले आहे. आरोग्य यंत्रणेमाफत 2436 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात ताप व खोकल्याच्या रुग्णांचे सक्रिय सर्वेक्षण सुरू आहे. 
जिल्हा रुग्णालय येथील 28 क्रमांकाच्या ओपीडीला येणाऱ्या मधुमेह, उच्चरक्तदाब व हृदयरोग असलेल्या व्यक्तींना आता त्यांच्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तपासणी व औषधोपचारांची सुविधा मिळणार आहे. 

या क्रमांकावर संपर्क साधा 
रुग्ण वाहतुकीसाठी तसेच काही आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास आपत्कालीन वैद्यकीय सेवा कार्यक्रमाचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. शंतनू वाईकर यांना - 9405956747 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी केले आहे. 

अंगणवाडी मुलांचा आहारही घरपोच 
अंगणवाडीतील मुलांना मिळणारा शिधा व मध्यान पोषण आहाराअंतर्गत मुलांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा शिधा त्यांना देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे सर्व वाटप घरपोच करण्यासाठी ग्रामीण स्तरावर शाळांनी व ग्राम समित्यांनी नियोजन करावे तसेच जर शाळा स्तरावर हे वाटप करण्यात येणार असेल तर वाटपादरम्यान सोशल डिस्टंन्सिगचे पालन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ahilyabai Holkar Farmer Loan Waiver Scheme Ratnagiri
Patradevi excise checkpost ACB raid
Tree cutting for the Sai Dongar-1 project in Karjat has been halted amid growing opposition.
Sachin Tendulkar Ganpatipule temple visit today
Marathi News Esakal
www.esakal.com