सिंधुदुर्गात कोरोनाने आणखी तिघांचा मृत्यू 

Corona killed three more at Sindhudurg
Corona killed three more at Sindhudurg

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आज नव्याने 34 व्यक्तींचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यामुळे एकूण बाधित संख्या 4 हजार 580 झाली असून यातील कणकवली तालुक्‍यातील संख्या एक हजार 500 आहे; मात्र तीन रुग्णांचे निधन झाले आहे. त्यामुळे कोरोना मृत्यू संख्या 120 झाली आहे. 

नव्याने शनिवारी (ता. 17) तब्बल 58 व्यक्तींनी कोरोनावर मात केली होती. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 3 हजार 861 झाली होती. तर काल 27 व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या 4547 वर पोचली होती. आज ही संख्या 4 हजार 580 झाली आहे. दुर्दैवाने आज तीन मृत्यू झाल्याने मृत व्यक्तींची संख्या 120 झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली. 

546 रुग्ण सक्रिय असून त्यापैकी 7 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यात 3 ऑक्‍सिजनवर तर 4 व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. आर.टी.पी.सी.आर. टेस्टमध्ये 18 हजार 732 नमुने तपासण्यात आले. यातील 3 हजार 344 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. ऍन्टिजेन टेस्टमध्ये एकूण 12 हजार 599 नमुने तपासले पैकी 1 हजार 344 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण 31 हजार 331 नमुने संख्या झाली आहे. आज नव्याने 229 नमुने घेण्यात आले आहेत. 

तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण (कंसात मृत्यूचा आकडा) 
देवगड 293 (8), दोडामार्ग 200 (2), कणकवली 1500 (30), कुडाळ 1031 (21), मालवण 372 (13), सावंतवाडी 596 (29), वैभववाडी 136 (7), वेंगुर्ले 439, (9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण 13 (1) तर तालुकानिहाय सक्रिय रुग्ण देवगड - 21, दोडामार्ग - 30, कणकवली - 126, कुडाळ - 116, मालवण - 67, सावंतवाडी - 78, वैभववाडी - 6, वेंगुर्ले - 102 अशा प्रकारे आहेत. 

मृत रुग्णांना विविध आजार 
जिल्ह्यात आज नव्याने तीन व्यक्तींचे कोरोनामुळे निधन झाले आहे. यात सावंतवाडी कुणकेरी येथील 74 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यांना उच्च रक्तदाब व मधुमेह होता. कुडाळ तालुक्‍यातील पांग्रड येथील 46 वर्षीय पुरुषाचे निधन झाले आहे. त्यांना मधुमेह होता तसेच त्यांना लठ्ठपणा होता. मालवण शहरातील 72 वर्षीय पुरुषाचाही मृत्यू झाला असून त्यांनाही मधुमेह आणि किडनी आजार होता. 
 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com