कोरोना लॅब कर्मचाऱ्यांची व्यवस्था राज्याने करावी

कोरोना लॅबमधील एनआरएचएमचे कर्मचारी केंद्राने काढल्यामुळे त्यांची व्यवस्था राज्य सरकारने केली पाहिजे, असे मत मंत्रीमंडळ बैठकीत मांडले आहे.
Uday Samant
Uday SamantSakal
Updated on: 

रत्नागिरी - कोरोना लॅबमधील एनआरएचएमचे कर्मचारी केंद्राने काढल्यामुळे त्यांची व्यवस्था राज्य सरकारने केली पाहिजे, असे मत मंत्रीमंडळ बैठकीत मांडले आहे. त्यानुसार आरोग्यमंत्र्यांनी आदेश काढला आहे. सध्या मुंबईतून अहवाल येत आहेत. राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये दररोज १५० च्या दरम्यान बाधित आढळू लागल्यास येथेच तपासणी करून अहवाल दिला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.

सध्या रत्नागिरी जिल्ह्यात रुग्णसंख्या ५० ते ६० च्या दरम्यान आहे. आता कोरोना नियंत्रणात आहे. परंतु हा आकडा वाढू लागल्यास अधिक काळजी घ्यावी लागेल, असेही सामंत म्हणाले. राज्यातील महाविद्यालये चालू करण्यात येणार का, या प्रश्नावर मंत्री सामंत म्हणाले की, तिसऱ्या लाटेची भीती अजूनही आहे. महाविद्यालये सुरू झाली पाहिजेत. परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी काळजी घेतली पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण झाल्यावर आणि प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडून संबंधित जिल्ह्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, कोरोनाची स्थिती पाहूनच महाविद्यालये ऑफलाईन पद्धतीने सुरू करायची का, याबाबत निर्णय नंतर जाहीर केला जाईल.

लवकर किनारा स्वच्छ

कोकणच्या किनाऱ्यावर आलेले तेलाचे तवंग आणि किनारा स्वच्छतेबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे चर्चा करून लवकरात लवकर किनारा स्वच्छ करण्याबाबत निर्णय होईल. त्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येईल, अशी माहितीही मंत्री उदय सामंत दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com