सिंधुदुर्गाची वाढली चिंता़; २४ तासात आढळले जिल्ह्यातील उच्चांकी रुग्ण

विनोद दळवी
Sunday, 30 August 2020

दिवसभरात आणखी 15 जण कोरोनामुक्त झाले. अशांची एकूण संख्या 641 झाली आहे. 

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने 156 कोरोना रुग्ण मिळाले आहेत. गेल्या पाच महिन्यातील एका दिवसातील ही उच्चांकी वाढ आहे. त्यामुळे जिल्ह्याची बाधित संख्या एक हजार 265 झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण संख्येत सुद्धा 605 एवढी विक्रमी वाढ झाली आहे. दरम्यान, दिवसभरात आणखी 15 जण कोरोनामुक्त झाले. अशांची एकूण संख्या 641 झाली आहे. 

जिल्ह्यात काल (ता.29) दुपारपर्यंत एक हजार 109 बाधित होते. त्यानंतर आज दुपारपर्यंत आलेल्या 645 अहवालात तब्बल 156 जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. एवढ्या मोठ्या संख्यने बाधित मिळण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे सिंधुदुर्गवासियांच्या चिंतेत भर पडली आहे. 

रविवारी पॉझिटिव्ह आलेल्या 156 रूग्णांमध्ये कणकवली तालुक्‍यातील 34 जण आहेत. कलमठ 3, तळेरे 1, कासार्डे 3, खारेपाटण 2, ओझरम 4, करंजे 2, कळसुली 1, हुबरठ 1, सांगवे 1, वरवडे 2, कनेडी 2, कणकवली 7, हरकुळ 1, करूळ 1, नाटळ 1, दारीस्ते 1, फोंडाघाट 1 अशी त्यांची वर्गवारी आहे. वेंगुर्ले तालुक्‍यातील 36 जण आहेत. मोचेमाड 12, परुळे 1, नैचीआड 6, वेंगुर्ले 11, शिरोडा 5, खवणे 1 अशी वर्गवारी आहे. मालवण तालुक्‍यात 18 जण असून आचरा 11, कोळंब 1, कुंभारमाठ 3, गवंडीवाडा 1, मालवण 2 अशाप्रकारे समावेश आहे. कुडाळ तालुक्‍यात कुडाळ 3, ओरोस 8, वालावल 1, पिंगुळी 1 असे 13 रुग्ण मिळाले आहेत. सावंतवाडी तालुक्‍यात 28 रुग्ण मिळाले आहेत. यात सावंतवाडी शहरात 21, तळवडे 4, दांडेली 2, माजगाव 1 अशाप्रकारे रुग्णांचा समावेश आहे. दोडामार्ग तालुक्‍यात तळकट 3, दोडामार्ग 4 असे 7 रुग्ण मिळाले आहेत. देवगड तालुक्‍यात नाडण 5, मुणगे 3, साळशी 1 असे 9 रुग्ण मिळाले आहेत. वैभववाडी तालुक्‍यात वैभववाडी 3, कोळपे 2, खांबाळे 2 असे 7 रुग्ण मिळाले आहेत. 
आज नव्याने 373 नमूने आले. त्यामुळे नमुन्यांची संख्या 13 हजार 413 झाली. यातील 13 हजार 281 अहवाल आले आहेत. 132 प्रलंबित आहेत. आतापर्यंत 20 व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

संस्थात्मक क्‍वारंटाईनमध्ये गाव पातळीवर 87 व्यक्ती कमी झाल्या. तेथे 11 हजार 428 जण आहेत. नागरी क्षेत्रात 19 व्यक्ती वाढल्याने तेथील संख्या चार हजार 267 आहे. जिल्ह्यात आज नव्याने एक हजार 71 जण दाखल झाले. त्याने दोन मेपासून दाखल होणाऱ्यांची संख्या दोन लाख सहा हजार 335 झाली आहे. जिल्ह्यात 161 कंटेंन्मेंट झोन सक्रिय आहेत. 

सर्वाधिक रुग्ण येथे आढळले 

  • कणकवली तालुका ः 34 
  • वेंगुर्ले तालुका ः 36 
  • सावंतवाडी तालुका ः 28 

आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात शिरकाव 
जिल्ह्यात ऑगस्टमध्ये कोरोनाच्या वाढत्या संख्यने कहर केला आहे. जिल्ह्यात स्थानिक नागरिकांना मोठ्या संख्यने लागण होत आहे. यात कोरोना योद्धा असलेल्या व्यक्तींचाही समावेश आहे. नव्याने मिळालेल्या रुग्णामध्ये मालवण तालुक्‍यातील आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्‍टर व अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. 

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patient Increased in Sindhudurg