येथे होतेय "पॉझिटिव्ह' संख्येत दिलासादायी घट..... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जुलै 2020

कोविड योद्धाच कोरोनाच्या लपेटमध्ये येत आहेत. लॉकडाउनच्या काळात संख्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याने सर्वांचीच काळजी वाढली. 

रत्नागिरी : जिल्ह्यात  आठ नवीन पॉझिटिव्ह सापडले. गेल्या 48 तासांत सापडलेल्या 56 रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर आठ पॉझिटिव्ह रुग्ण हा आकडा दिलासा देणारा आहे. एकूण रुग्णांची संख्या 814 वर गेली. यात जिल्हा परिषदेचा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या कुटुंबातील काहींना कोरोनाची लागण झाली, तर एका डॉक्‍टरच्या नातेवाईकाला लागण झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 522 झाली. 

जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. वाढणारी ही संख्या प्रशासन आणि आरोग्य विभागाला विचार करायला लावणारी आहे. कोविड योद्धाच कोरोनाच्या लपेटमध्ये येत आहेत. लॉकडाउनच्या काळात संख्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याने सर्वांचीच काळजी वाढली. 

हेही वाचा- सकाळ न्यूज इफेक्ट : अखेर व्यंक्या लंबोरेला मिळाली मदत ते झाले भावुक.... -

जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 522 झाली. आज कोविड केअर सेंटर (देवधे, लांजा) येथून एक, जिल्हा कोविड रुग्णालय दोन, कोविड केअर सेंटर (केकेव्ही दापोली) चार, कोविड केअर सेंटर (पेढांबे) पाच, कोविड केअर सेंटर (घरडा) तीन अशा 15 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात जे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले त्यात जिल्हा कोविड रुग्णालय आठ, लांजा चार, राजापूर पाच, मंडणगड चार, दापोली पाच, कळंबणी पाच, संगमेश्‍वर एक रुग्णाचा समावेश आहे. रत्नागिरीत सापडलेल्या रुग्णांमध्ये भाट्ये रोड, राजिवडा, नर्सिंग हॉस्टेल, शंखेश्वर गार्डन, गीता भुवन, नरशिंगे, साईनगर कुवारबाव व गद्रे कंपनी, सन्मित्रनगर हे सात क्षेत्र कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत. सध्या सक्रिय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 263 आहे. जिल्ह्यात 74 सक्रिय कन्टेन्मेंट झोन आहेत. संस्थात्मक विलगीकरण कक्षात 68 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत. आजअखेर होम क्वारंटाईन असलेल्यांची संख्या 16 हजार 775 आहे. 

हेही वाचा- रत्नागिरीत काही निर्बंधांसह लॉकडाऊन होणार शिथिल : जिल्हाधिकार्‍यांचे आश्‍वासन​ -

जिल्ह्यातील कोरोना स्थिती 
* एकूण 11 हजार 670 नमुने तपासणी 
* 10 हजार 516 तपासणी अहवाल प्राप्त 
* 807 अहवाल पॉझिटिव्ह 
* 10 हजार 516 अहवाल निगेटिव्ह 
* 113 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित 
* बरे झालेले 522 
* मृत्यू 28 
* सक्रिय पॉझिटिव्ह 264 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patients fight in coronavirus positive impact