ब्रेकिंग : रत्नागिरीत कोरोनाचा कहर सुरुच

राजेश शेळके
Saturday, 15 August 2020

24 तासात 7 जणांचा मृत्यू  

रत्नागिरी : गेल्या 24 तासात जिल्हयात अन्टीजेन चाचणीत 41 तर आरटीपीसीआर चाचणीत 25 असे एकूण 66 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्हयातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2747 इतकी झाली. आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 3, कामथे रुग्णालय 1 तसेच 3 रुग्ण होम ऑयसोलेशनमध्ये उपचार घेत असताना बरे झाले. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 1788 झाली आहे. तर 7 जणांचा  मृत्यू झाला आहे. यातील 4 कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील आहेत.

हेही वाचा - या गावात एकही विहीर नाही पण उन्हाळ्यातही वाहतात खळखळणाऱ्या पाण्याचे झरे..

पॉझिटिव्ह खालीलप्रमाणे दाखल

आरटीपीसीआर मधील 
रत्नागिरी - 25

ॲन्टीजेन टेस्ट मधील 
रत्नागिरी - 18,  राजापूर-1, लांजा-5, संगमेश्वर-8, घरडा रुग्णालय-9, एकूण 66 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.  

आजच्या प्राप्त माहितीनुसार 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यु झाला आहे. चिपळूण तालुक्यातील खिंडी येथील 65 वर्षीय रुग्णाचा तसेच डोकलवाडी येथील 65 वर्षीय महिला रुग्णाचा उपचार दरम्‍यान मृत्यु झाला. खेड तालुक्यातील भोस्ते येथील 65 वर्षीय महिला रुग्ण, खेड येथील 55 वर्षीय रुग्ण, आणि लोटे येथील 70 वर्षीय रुग्णाचा दाभोळ, दापोली येथील 73 वर्षीय कोरोना रुग्णाचा आणि गवळीवाडा, रत्नागिरी येथील 72 वर्षीयकोरोना रुग्णाचाकोरोना रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यु झाला. त्यामुळे एकूण मृत्युंची संख्या आता 101 इतकी झाली आहे.

सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे 

एकूण पॉझिटिव्ह 2747, बरे झालेले-1788, मृत्यू-101, ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह-858

ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन 

जिल्हयामध्ये 202 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 34 गावांमध्ये,  दापोली मध्ये 10 गावांमध्ये, खेड मध्ये 47 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 7, चिपळूण तालुक्यात 89 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 2, राजापूर तालुक्यात 8, संगमेश्वर तालुक्यात 1, गुहागर तालुक्यात 4 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

हेही वाचा - लग्नाला नकार दिल्याचा डोक्यात राग ठेऊन मुलीच्या वडीलांचा त्याने केला खून...

संस्थात्मक विलगीकरण 

संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी - 29, समाजकल्याण, रत्नागिरी - 6,  उपजिल्हा रुग्णालय कामथे -48,  उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -23, कोव्हीड केअर सेंटर घरडा -4, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे - 7, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली - 20, गुहागर - 5, पाचल -1असे एकूण 143 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत. आज  होमक्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 52 हजार 408 इतकी आहे.

18 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह 

जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 21 हजार 865 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 21 हजार 292 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2747 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 18 हजार 533 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 573 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 573 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.  

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patients increased in ratnagiri