COVID2019 : महाराष्ट्रात कोरोनाच्या संख्येत वाढ : रत्नागिरीत सापडला कोरोनाचा रुग्ण....

Corona population increases Coronary patients found in Ratnagiri kokan marathi news
Corona population increases Coronary patients found in Ratnagiri kokan marathi news

रत्नागिरी : कोरोना व्हायरसने रत्नागिरीकरांना मोठा धक्का दिला आहे. गुहागर तालुक्‍यातील संशयित रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे संपूर्ण यंत्रणा हडबडून गेली आहे. रुग्णामध्ये अपेक्षित लक्षणे न दिसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोणतीही सुरक्षितता न बाळगता त्याच्यावर उपचार केला आहे. त्यामुळे सर्वच यंत्रणा हादरली आहे. तातडीच्या बैठका आरोग्य विभागाने आणि प्रशासनाने सुरू केल्या आहेत. स्वतंत्र कक्षामध्ये या रुग्णाला ठेवण्यात आले आहे.


संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना (व्हायरस) रोगाबाबत नागरिक दहशतीखाली असताना रत्नागिरीतच  कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागातून आलेल्या आठ रुग्णांना कोरोना संशयीत म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यामध्ये हातीव  (राजापूर) गणपतीपुळे व जयगड येथील तिघे पुणे  व  ठाणे येथून जाऊन आल्याने त्यांना कोरोनासारखी लक्षणे जाणवू लागली. काल आणखी दोन संशयित जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झाले होते यामध्ये शृंगारतळी आणि रत्नागिरीतील कुवारबाव येथील रुग्णांचा समावेश होता. या तिघांनाही सर्दी-खोकल्याचा त्रास असून प्रकृतीत सुधारणा न झाल्यास त्यांच्या थुंकीचे व थ्रोडचे नमुन तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते.  

पन्नास वर्षाच्या वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी याला दुजोरा दिला. आज रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला त्यामध्ये शृंगारतळी येथील पन्नास वर्षाच्या वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या अहवालामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा हादरून गेले आहे. खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी बैठकांची लगबग सुरू झाली आहे. या रुग्णाला स्वतंत्र कक्षामध्ये पूर्ण दक्षता घेऊन ठेवण्यात आले आहे. अन्य संशयितांना दुसऱ्या वार्ड मध्ये हलविले आहे.  

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली

जिल्हा प्रशासन उद्या यासंदर्भात काही महत्त्वाचे आणि कठोर निर्णय घेण्याची शक्‍यता आहे.दुबईहून शृंगारतळी मध्ये हा संशय आला होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह त्या परिसरामध्ये आरोग्य संदर्भातील उपायोजना करण्यात येणार आहेत. या रुग्णामुळे मात्र महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com