esakal | सावधान ! चिपळूणात 62 तर, राजापुरात 12 नवे रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Positive 62 In Chiplun 12 In Rajapur Ratnagiri Marathi News

कोरोना रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून बाधित रुग्ण शोधण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी शहरात व्यापाऱ्यांची अँटीजेन टेस्ट केली जात आहे.

सावधान ! चिपळूणात 62 तर, राजापुरात 12 नवे रुग्ण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चिपळूण ( रत्नागिरी )  - शहरासह तालुक्‍यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच आहे. तालुक्‍यात मंगळवारपर्यंत 24 तासांत 62 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये खेर्डी आणि मांडकी येथे सर्वाधिक जास्त रुग्ण आढळून आले. 

चिपळुणात दिवसात 62 बाधित ! 

कोरोना रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून बाधित रुग्ण शोधण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी शहरात व्यापाऱ्यांची अँटीजेन टेस्ट केली जात आहे. तालुक्‍यात मंगळवारी आलेल्या अहवालात वालोपे- 2, पाग गोपाळकृष्णवाडी- 1, खेर्डी विकासवाडी- 1, खेर्डी माळेवाडी- 4, खेर्डी वरचीवाडी- 1, खेर्डी कातळवाडी- 1, खेर्डी- 8, दळवटणे रामवाडी- 1, पागमळा- 2, नांदिवसे लोगडेवाडी- 1, चिपळूण सिव्हिल कोर्टजवळ- 1, मार्कंडी- 1, मार्कंडी शिवानंद अपार्टमेंट- 4, पिंपळी तीनवड- 1, इंद्रायणी अपार्टमेंट डीबीजेजवळ- 1, पाग कृष्णेश्वरनगर- 1, कोंढे मधलीवाडी- 1, काविळतळी लॅन्डस्टोन पार्क- 1, रामकृष्ण प्लाझा गणपती मंदिराजवळ- 1, खडपोली तांबटवाडी- 1, कोळकेवाडी- 1, कुंभार्ली लांबेवाडी- 1, डेरवण हॉस्पिटल कॅम्पस्‌विना बिल्डिंग- 1, फुरुस- 1, शिरगांव- 1, नायशी- 1, मांडकी- 11, कापसाळ- 1, कात्रोळी- 1, शिवाजीनगर चिपळूण- 3, करंबवणे- 1, सावर्डे- 1, नवा भैरी जवळ चिपळूण- 1, मार्गताम्हाणे बाजारपेठ- 1, खेंड चौकी- 1 असे एकूण 62 बाधित रुग्ण आढळून आले आहेत. 

राजापुरात 12 पॉझिटिव्ह रुग्ण ! 

राजापूर - गेल्या काही दिवसांमध्ये तालुक्‍यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या चोवीस तासामध्ये तब्बल बारा पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. 
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मिठगवाणे-चिरेखाण, कोदवली-बौद्धवाडी, ओझर-साबळेवाडी, पाचल-विद्यानगर, धोपेश्‍वर-खांबलवाडी, पंचायत समिती चव्हाण चाळ, पंचायत समिती कार्यालय येथील प्रत्येकी एका रुग्णासह वाल्ये पश्‍चिमवाडी येथील दोन रुग्णांचा समावेश आहे. झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांमध्ये तालुक्‍यातील रुग्णांची संख्या 161 झाली आहे. 

मिठगवाणे चिरेखाण आणि कोदवली बौद्धवाडी येथे आढळलेले रुग्ण स्थानिक असून सर्दी, ताप आल्याने त्यांचे स्वॅब घेतले होते. मंगळवारी घेतलेल्या 32 जणांच्या स्वॅब तपासणीपैकी आज आलेल्या अहवालामध्ये नऊ अहवाल पॉझिटिव्ह आले. ओझर-साबळेवाडी येथील व्यक्तीची ऍटीजेन टेस्ट घेतली होती. स्वतःहून क्वारंटाईन झालेला पाचल गाव काही दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झाला होता. मात्र, त्या ठिकाणी पुन्हा नव्याने एक रुग्ण आढळला आहे. 

123 रुग्ण झाले बरे 
पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. आजपर्यंत तालुक्‍यातील 161 पैकी तब्बल 123 रुग्ण बरे झाले आहेत. 

loading image