ब्रेकिंग - रत्नागिरी जिल्ह्यात नवे 16 कोरोना पॉझिटिव्ह सापडले....

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

जिल्ह्यातील १०८ करोना रुग्णांपैकी आतापर्यंत ३३ जणांना उपचारांनंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस सातत्याने वाढत असलेल्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काल (१९ मे) १६ जणांना पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले होते; मात्र आज (२० मे) पुन्हा नवे १६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या १०८ झाली आहे.

जिल्ह्यातील १०८ करोना रुग्णांपैकी आतापर्यंत ३३ जणांना उपचारांनंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात ७२ करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

वाचा - खळबळजनक ! विलगीकरण कक्षातून झोपण्यासाठी जात होते ते घरी....

१९मे रोजी रात्रीनंतर मिरजमधून ८२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ६६ अहवाल निगेटिव्ह असून, १६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. १६ पॉझिटिव्ह अहवालांमध्ये रत्नागिरीतील सहा, संगमेश्वरातील सहा आणि गुहागरातील चार अहवालांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या बहुतेक सर्व व्यक्ती विलगीकरणात होत्या. तसेच, त्यातील बहुतेक जणांचा मुंबई प्रवासाचा इतिहास आहे.

पॉझिटिव्ह रुग्ण संगमेश्वर तालुक्यातील धामापूर (२), कोळंबे (२), भिरकोंड (१), कसबा (१), गुहागर तालुक्यातील शृंगारतळी (४), रत्नागिरी तालुक्यातील कर्ला (१), रत्नागिरी (१) या गावांतील आहेत. तसेच, चार रुग्ण रत्नागिरी नर्सिंग हॉस्टेलमधील आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona positive patient found in ratnagiri district

टॅग्स
टॉपिकस