उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण

विनोद दळवी
Tuesday, 29 September 2020

मी ठणठणीत असून पुढील आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार, अशी माहिती उदय सामंत यांनी केलेल्या ट्वीटद्वारे दिली आहे.

ओरोस : राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली. माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी ठणठणीत असून पुढील आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार, अशी माहिती उदय सामंत यांनी केलेल्या ट्वीटद्वारे दिली आहे. 

गेले अनेक दिवस मंत्री सामंत शासकीय कार्यक्रमांपासून अलिप्त आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेशी सुद्धा ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधुन जिल्ह्यातील कोरोना परिस्थिचा आढावा घेत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी याच माध्यमातून 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' योजनेचा आढावा घेतला. तसेच जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्यांची बैठक घेतली होती. आज ते कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा -  सीआरझेडप्रश्नी सिंधुदुर्गात फज्जा उडालेली ई सुनावणी आज ऑफलाईन होणार
       

याबाबत मंत्री सामंत यानी मंगळवारी ट्वीट करीत ही माहिती दिली आहे. गेले दहा दिवस मी स्वत: क्वारंटाईन आहे. त्यामुळे मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली. याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी गेले दहा दिवसात कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन उदय सामंत यांनी केले आहे. तसेच मी ठणठणीत असून पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार, असेही उदय सामंत यांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे. सध्या उदय सामंत यांची प्रकृती ठणठणीत असून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ते त्यांच कामकाज सुरु ठेवणार आहेत, अशीही माहिती मिळत आहे.

हेही वाचा - पावसाची विश्रांती, भात कापणीला वेग 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the corona report of mantri uday samant positive in konkan but he was already quarantine