रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वाढतोय कोरोनाचा फैलाव

राजेश शेळके
Tuesday, 21 July 2020

रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी 19 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात नवीन 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आता एक हजार 309 झाली आहे. साखरीनाटे (ता. राजापूर) येथील एका 65 वर्षीय कोरोना रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या 42 झाली आहे. 

दरम्यान, 19 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या 768 झाली आहे. कोरोना आता ग्रामीण भागात जास्त पसरत असल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यात सोमवारी रात्री 37 नवीन पॉझिटिव्ह रग्ण आढळले होते. आज दिवसभरात नवीन 10 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे गेल्या 24 तासात एकूण 47 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा कोव्हिड रुग्णालय 21, कामथे उपजिल्हा रुग्णालय 24, कळंबणी 1 आणि ऍन्टीजेन टेस्टमध्ये 1 रुग्ण आढळून आला आहे.  कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हिड रुग्णालय एक, संगमेश्वर दोन, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली 15 आणि 1 कामथे येथील रुग्णांचा समावेश आहे. 
सध्या ऍक्‍टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 499 आहे तर रत्नागिरी तालुक्‍यात सापडलेल्या रुग्णांमुळे मंगळवारी सन्मित्रनगर रत्नागिरी, लक्ष्मी आर्केड, साळवी स्टॉप, रत्नागिरी, जयगड-रत्नागिरी, कोतवडे घामेलेवाडी-रत्नागिरी, गावडे आंबेरे-रत्नागिरी, झरेवाडी, हातखंबा-रत्नागिरी, कर्ला मुसलमानवाडी, राजिवडा-रत्नागिरी हे क्षेत्र कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात सध्या 105 ऍक्‍टिव्ह कंटेन्मेंट झोन आहेत तर संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये एकूण 109 संशयित दाखल आहेत. आज अखेर होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या 15 हजार 510 इतकी आहे. परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारपर्यंत एक लाख 98 हजार 215 व्यक्ती दाखल झाल्या. जिल्ह्यातून इतर राज्यात तसेच जिल्ह्यात गेलेल्यांची संख्या एक लाख 334 झाली आहे. एकूणच आकडेवारी पाहता आता ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा फैलाव होताना दिसत आहे. तपासणी अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाण अधिक आहे.

        जिल्ह्यातील स्थिती

  • जिल्हात तपासलेले नमुने - 14 हजार 596 
  • तपासणी अहवाल प्राप्त - 13 हजार 992 
  • पॉझिटिव्ह अहवाल - 1 हजार 308 
  • निगेटिव्ह अहवाल - 12 हजार 681
  • प्रलंबित अहवाल - 604 नमुन्यांचे  
  • बरे झालेले रुग्ण- 768
  • एकूण ऍक्‍टिव्ह पॉझिटिव्ह - 499
     
  • संपादन - विजय वेदपाठक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona is spreading in the rural areas of Ratnagiri district