esakal | रत्नागिरीत कोरोना स्वॅब टेस्टिंग मशिन बंद पडल्याने तपासणी रखडली
sakal

बोलून बातमी शोधा

Corona swab testing machine shut down in Ratnagiri

आतापर्यंत 657 नमुने प्रलंबित असून तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी संबंधित कंपनीच्या अधिकार्‍यांना बोलावण्यात आले आहे.

रत्नागिरीत कोरोना स्वॅब टेस्टिंग मशिन बंद पडल्याने तपासणी रखडली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्वॅब टेस्टींग मशिन बंद पडल्याने नमुन्यांची तपासणी रखडली आहे. आतापर्यंत 657 नमुने प्रलंबित असून तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी संबंधित कंपनीच्या अधिकार्‍यांना बोलावण्यात आले आहे. परंतु, त्यासाठी आणखी एक दिवस जाणार असल्याने प्रलंबित नमुन्यांची संख्या वाढणार आहे. 


दरम्यान, गेल्या 24 तासात 4 नवे  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 016  झाली आहे. दोघांचा मृत्यू झाला आहे. आज 14 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.  यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 371 झाली आहे. जिल्ह्यात चाकरमान्यांची संख्या वाढत असताना रुग्णालयातील प्रयोगशाळा दोन दिवस झाले बंद पडली आहे. मशिनचा एक पार्ट खराब झाल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. दोन दिवस झाले तपासणी अहवाल न आल्याने प्रलंबित अहवालांची संख्या 657 झाली आहे. दुरुस्तीला आणखी दोन दिवस जाणार असल्याने प्रलंबित अहवालांचा आकडा फुगणार आहे. त्यात अन्य लॅबवर प्रचंड ताण असल्याने त्याचा अहवाल तत्काळ मिळणे शक्य नाही. म्हणून मशिन दुरुस्त होण्याची वाट पाहण्याशिवया पर्याय नाही. जिल्हा रुग्णालयाकडून याला दुजोरा देण्यात आला. शहरात सतत दोन ते तीन दिवस विजेचा पुरवठा कमी अधिक प्रमाणात होत होता. नियमित वीजपुरवठा नसल्याने नमुना तपासणी अहवालची मशिन बंद पडत होती. 

हे पण वाचाहुश्श ! तब्बल दोन दिवसानंतर सुटला राजापूरचा वेढा  

मशिनच्या बॅटरीचा पार्ट गेला. तो आणण्यासाठी व्यक्ती मुंबईला गेलेली आहे. एक किंवा दोन दिवस जाण्याची शक्यता आहे. रोजचे नमुना तपासणी अहवाल वेळेवर मिळत नव्हते. त्यात हा उशिर झाल्याने स्वॅब घेतलेल्या लोकांना अहवाल पॉझिटिव्ह की निगेटिव्ह कळत नसल्याने गोंधळ उडाला आहे. जिल्ह्यात अ‍ॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा संख्या 577 आहे. 

एकूण तपासणी अहवाल -19 हजार 222
प्राप्त अहवाल -18 हजार 565 
 पॉझिटिव्ह अहवाल -2016 
एकूण निगेटिव्ह अहवाल -16  हजार 537 
 एकूण प्रलंबित अहवाल -657    

संपादन- धनाजी सुर्वे 
 

loading image