esakal | Covid 19 Update: सावंतवाडीत आउट ऑफ स्टॉक: लसीकरण बंद 
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination Sawantwadi stopped covid 19 health marathi news


राज्यभरातील महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्लस पाठविण्यात आली. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे लसीची मागणी वाढली आहे. त्यामुळे पालिका क्षेत्रात तसेच कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी या लसीचा तुटवडा का निर्माण होऊ लागला आहे.

Covid 19 Update: सावंतवाडीत आउट ऑफ स्टॉक: लसीकरण बंद 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड लस कक्ष आउट ऑफ स्टॉक झाला आहे. त्यामुळे हा कक्ष बंद केला आहे. या रुग्णालयासाठी 4 हजार 380 एवढ्या लस प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी आत्तापर्यत 4 हजार 148 जणांना लस देण्यात आली आहे. कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने घाबरलेल्या नागरिकांकडून लस कधी येणार हा सवाल वारंवार उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी यांना विचारला जात आहे. तुटवड्याबाबत नागरिकांत मोठी नाराजी आहे. 

देशात राज्यात व जिल्ह्यात कोरोना रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना होण्यापूर्वी प्रतिबंधक लस घ्यायला हवी ही समजूत झाल्याने नागरिक आता कोरोना लसीकरणासाठी मानसिकदृष्ट्‌या तयार झाले आहेत. आठवडाभरापूर्वी नागरिक येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड केंद्राबाहेर रांगा लावून गर्दी करत होते. लसीचा पुरवठा संपल्यावरही हीच स्थिती होती. लस घेण्यासाठी दाखल झालेल्या नागरिकांकडून कधी येणार आहे हे पुन्हा पुन्हा विचारणार होते. 

येथील उपजिल्हा रुग्णालयात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आले होती. त्यानंतर देशभरात कोरोना रूग्णवाढीचा आलेख बऱ्यापैकी घटला होता. त्यामुळे नागरिकांनी कोरोना आता हळूहळू हद्दपार झाला आहे, असा समज करून घेतला आणि लस घेण्याकडे बऱ्याच जणांनी दुर्लक्ष केले होते. आणि सध्या अचानक कोरोणाचे रुग्ण वाढल्याने नागरिकांना कोरोना लसीचे महत्त्व जाणवू लागले आहे. पूर्वी झालेल्या लसीकरणामध्ये 65 वर्षांवरील वयोवृद्ध तर कर्तव्य दक्ष शासकीय अधिकारी, पोलिस, आरोग्य विभागातील सर्वाना कोरोनाची पहिली लस देण्यात आली आहे. 

हेही वाचा- रत्नागिरीत लसीचा तुटवडा; नियमित लसीकरण बंद, 1100 डोस दुसर्‍या टप्प्यासाठी
 

राज्यभरातील महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्लस पाठविण्यात आली. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे लसीची मागणी वाढली आहे. त्यामुळे पालिका क्षेत्रात तसेच कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी या लसीचा तुटवडा का निर्माण होऊ लागला आहे. याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्राबाहेर लस संपल्याचा फलक बाहेर लावण्यात आला असून सध्या लसीकरणासाठी आलेल्या सर्वांना माघारी परतावे लागत आहे. 4 दिवसांपूर्वी पुन्हा लसीचा पुरवठा संपला आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी आतापर्यंत 4 हजार 380 एवढ्या कोविड लसीचा पुरवठा करण्यात आला होता. 

रुग्णालयाच्या आवारात कोविड लसीकरण केंद्र स्थापन करून आत्तापर्यंत 4 हजार 148 जणांना लस देण्यात आली. यात जास्त करून 65 वर्षांच्या वयोवृद्ध नागरिकांना प्राध्यानाने ही लस देण्यात आली. त्यानंतर पोलिस, डॉक्‍टर, अधिकारी, सेविका यांना लसीकरण करण्यात आले आहे. सुरुवातीला लसीकरण केंद्रात जाणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होती; मात्र हळूहळू गैरसमज दूर झाल्यानंतर लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ लागली. सध्या रुग्णालयात असलेल्या लसचा पुरवठा संपल्यामुळे लसीकरण गेली 4 दिवस बंद आहे. तसा फलक रुग्णालय प्रशासनाने बाहेर लावला आहे. सध्या काही कालावधीकरिता लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. 


"" जसजसा लसीचा पुरवठा होईल तसतसे लसीकरण केले जाईल. तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे. लस तुटवड्याबाबत याबाबत आम्ही वरिष्ठ स्तरावर कळविले आहे. बरेचजण रात्री-अपरात्री, दिवसभरात लस आली का हे विचारण्यासाठी फोन करीत आहेत. '' 
- डॉ. उत्तम पाटील, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी.  

संपादन- अर्चना बनगे
 

loading image