चिपळुणात कोरोना लस दाखल

मुझफ्फर खान
Friday, 15 January 2021

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लस उपलब्ध झाल्याने आरोग्य यंत्रणेने आनंद व्यक्त करत त्याचे स्वागत केले. प्राप्त लसी शीतसाखळी केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आल्या.

चिपळूण (रत्नागिरी) : कोरोना लस शुक्रवारी चिपळूणला पोहोचली आहे. शनिवारपासून (ता. 16) लसीकरण सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील शंभर जणांना लसींचा डोस दिला जाणार आहे. चिपळूण तालुक्‍यासाठी प्राप्त झालेल्या लसीचा साठा कामथे उपजिल्हा रुग्णालयात सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

गुरुवारी लस चिपळुणात दाखल झाली. मकरसंक्रांतीच्या पर्वावर कोरोना प्रतिबंधक लस येऊन पोहोचली, याचा आनंद व्यक्त करत आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी "हॅप्पी टू व्हॅक्‍सिन'चा संदेश सोशल मीडियावर दिला. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लस उपलब्ध झाल्याने आरोग्य यंत्रणेने आनंद व्यक्त करत त्याचे स्वागत केले. प्राप्त लसी शीत साखळी केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आल्या.

हेही वाचा- सावंतवाडीत  उत्साहात मतदान -

उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सानप यांनी सकाळी शीत साखळी केंद्राची पाहणी केली. कोरोनाविरुद्धच्या लढाईत अहोरात्र योगदान देणाऱ्या आरोग्य विभागातील डॉक्‍टर, नर्स, शिपाई व इतर कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. कामथे उपजिल्हा रुग्णालयातील 88 आणि अडरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील 12 जणांना ही लस दिली जाणार आहे. 

संपादन- अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona vaccine in Chiplun