पोलिसांना नांदगावचे नेहमीच सहकार्य ः कोळी

पल्लवी सावंत
Sunday, 1 November 2020

यावेळी श्री. कोळी यांचा येथील मुस्लिम समाजाच्यावतीने "कोविड योद्धा' म्हणून सन्मान करण्यात आला.

नांदगाव (सिंधुदुर्ग) - नांदगाववासीयांनी पोलिस खात्यावर फार प्रेम आहे. त्यात मुस्लिम समाजांचा फार मोठा वाटा आहे. गावचे कायम सहकार्य लाभले आहे, असे कणकवली पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी सांगितले. येथे ईद-ए-मिलाद निमित्ताने आयोजित कोविड योद्धा सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. 

यावेळी श्री. कोळी यांचा येथील मुस्लिम समाजाच्यावतीने "कोविड योद्धा' म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी येथील सरपंचा आफोजा नावलेकर, सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले, येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. धनश्री रावराणे, पोलिस नाईक रमेश नारनवार, आरोग्य कर्मचारी श्रीमती पवार, आशासेविका यास्मिन साटविलकर, पत्रकार उत्तम सावंत, सचिन राणे, आसिफ बटवाले, मुज्फर बटवाले, अय्याज बटवाले, रफीक जेठी, हुसेन आंबर्डेकर, गफार बटवाले आदी उपस्थित होते. 

त्यांनी मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिस, आरोग्य कर्मचारी, पत्रकारांचा "कोविड योद्धा' म्हणून सत्कार झाला. लहान मुलांचा गुणगौरव करण्यात आला. कोरानाचे प्रादुर्भामुळे मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद निमित्ताने दरवर्षी काढण्यात येणारी रॅली, नमाज व इतर कार्यक्रम रद्द करत या सोहळ्यासाठी मास्कसह सोशल डिस्टन्स पाळत समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रज्जाक बटवाले यांनी प्रास्ताविक केले. मुज्जाफर बटवाले यांनी आभार मानले. 

पुन्हा लॉकडाउन नको 
श्री. कोळी म्हणाले,""बाहेरील देशात पुन्हा कोरानाचा प्रसार होत असल्याने लॉकडाऊन सुरू केले आहे. ती वेळ परत आपल्यावर येऊ नये, यासाठी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. आपल्या परिवारासह गाव, तालुका, जिल्हा व महाराष्ट्राचे रक्षण केले पाहिजे हे आपल्या हातात आहे.''  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona warriors felicitated at Nandgaon