खेड मध्ये कोरोनाचे संशयित रुग्ण आढळून आल्याने खळबळ....

Coronas suspected patient was found in khed
Coronas suspected patient was found in khed

खेड - देशात सर्वत्र कोरोना आजार मोठ्या वेगाने पसरत असताना आता कोकणातही या आजाराचे लक्षण असणारे 2 जण आढळून आल्याने खळबळ माजली आहे. नेपाळला सहलीसाठी जाऊन आलेल्या रत्नागिरी जिल्यातील खेड तालुक्यातील लोटे येथील 50 शिक्षकांपैकी दोघांना कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यामध्ये एक महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे. या दोघाही संशयितांना खेडमधील मुंबई - गोवा महामार्गावरील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात कोरोनासाठी खास तयार करण्यात आलेल्या इन्सुलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. तर त्यांच्यासोबत नेपाळला जे सहलीसाठी गेलेल्या इतर 48 जणांची देखील आरोग्य तपासणी करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातून एक पथक खेडकडे रवाना झाले आहे, अशी माहिती तहसीलदार सौ. प्राजक्ता घोरपडे यांनी दिली आहे. 

याबाबत कळबणी येथील डॉक्टर गरुड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की संशयित म्हणून त्यांना दाखल करून घेतले आहे. त्यांच्या घशातील थुंकीचे नमुने पुण्याला तपासणी साठी पाठवण्यात येणार असून तो अहवाल आल्यानंतर सर्व स्पष्ट होईल.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com