esakal | रत्नागिरीत जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात कोरोनाचा शिरकाव , पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना लागण...
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus entry In the office of District Superintendent of Police in Ratnagiri Families of police personnel corona infected

दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. 

रत्नागिरीत जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात कोरोनाचा शिरकाव , पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना लागण...

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी :  जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात कोरोनाने शिरकाव केला आहे. या कार्यालयात काम करणाऱ्या क्लार्कला कोरोनाची लागण झाली आहे. यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. 
 

रत्नागिरी तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. सोमवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार पोलीस अधिक्षक कार्यालयातील एका क्लार्क आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे पोलीस अधिक्षक कार्यालयातील कर्मचारी धास्तावले आहेत. याशिवाय दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आहे.  2 डॉक्टर देखील कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. 

हेही वाचा ....आणि भगवा फडकवायची होती उत्सुकता ! -

नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये आरोग्य मंदिर 3, पोलीस लाईन 3, आंबेकरवाडी 1, घाणेकरवाडी 1, एमआयडीसी 2, गावखडी 1, भाट्ये 1, राजीवडा 1, नाचणे 1, शिवाजी नगर 1, थिबा पॅलेस 1, सिविल हॉस्टेल 1 आणि बोर्डिंग रोड येथे 1 रुग्ण सापडला आहे.  गुहागर येथे 5 आणि कळंबणी येथे 2 असे 7 रुग्ण नव्याने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1992 इतकी झाली आहे.

हेही वाचा .रत्नागिरीत चोवीस तासात अतिवृष्टी ; संगमेश्वरमध्ये सर्वाधिक पाऊस -

जिल्ह्यातील स्थिती 
  एकूण तपासलेले नमुने    १८ हजार ५९३ 
  अहवाल प्राप्त झालेले नमुने    १८ हजार १६७ 
  कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण    १ हजार ९९२ 
  निगेटिव्ह अहवाल आलेले    १६  हजार २२४ 
  प्रलंबित अहवाल     ४२६ 
  एकूण बरे झालेले     १ जार ३०४
  मृत्यू     ६४
  एकूण ॲक्‍टिव्ह पॉझिटिव्ह     ६१८

loading image