सिंधुदुर्गात अजून नऊ अहवालांची प्रतिक्षाच

coronavirus impact konkan sindhudurg
coronavirus impact konkan sindhudurg
Updated on

ओरोस (सिंधुदुर्ग) -  जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात 29 रुग्ण दाखल आहेत. आतापर्यंत मिरज येथे तपासणीसाठी 82 नमुने पाठविण्यात आले असून, त्यापैकी 74 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला; तर नऊ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत 452 व्यक्तींना क्‍वारंटाइन केले आहे. त्यापैकी 380 व्यक्तींना घरीच क्‍वारंटाइन करण्यात आले; तर संस्थात्मक अलगीकरणात 72 व्यक्ती असून, 106 व्यक्तींनी 28 दिवसांचा क्‍वारंटाइन कालावधी पूर्ण केला. आरोग्य यंत्रणेमार्फत आज एक हजार 795 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून, जिल्ह्यात ताप व खोकल्याच्या रुग्णांचे सक्रिय सर्वेक्षण सुरू आहे. 

जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना नियमित मिळणाऱ्या 35 किलो धान्याव्यतिरिक्त पाच किलो प्रतिव्यक्ती धान्य मोफत देण्यात येत आहे. तसेच, केशरी शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती तीन किलो गहू आठ रुपये प्रतिकिलो दराने आणि दोन किलो तांदूळ 12 रुपये दराने मिळणार आहेत. 

जिल्ह्यातील स्थलांतरित, बेघर, मजूर व कामगारांसाठीच्या कॅम्पमध्ये असलेल्यांची प्रशासनातर्फे योग्य ती काळजी घेण्यात येत असून, त्यांच्या जेवणाची व निवासाची व्यवस्था केली आहे. जेवण व नाश्‍त्याव्यतिरिक्त त्यांना लागणाऱ्या वस्तू जसे टुथपेस्ट, साबण यांचाही पुरवठा करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com