ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आज नव्याने 13 कोरोना रुग्ण मिळाले आहेत, तर 5 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 208 रुग्ण सध्या उपचाराखाली असून, त्यातील 4 रुग्णांची तब्बेत चिंताजनक आहे. आज नवीन 72 नमुने घेण्यात आले. आतापर्यंत एकूण 53 हजार 878 नमुने तपासण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित 6 हजार 149 मिळाले आहेत. त्यातील 5 हजार 771 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 164 जणांचे निधन झाले आहे. परिणामी 208 रुग्ण उपचाराखाली राहिले आहेत. यातील 7 रुग्ण जिल्ह्याबाहेर जाऊन उपचार घेत आहेत. उर्वरित 201 रुग्णांवर जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल अथवा होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.
208 रुग्ण सक्रिय असून, त्यापैकी चार रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील 3 रुग्ण ऑक्सिजनवर, तर एक रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. जिल्ह्याबाहेर जाऊन सात रुग्ण उपचार घेत आहेत. आरटीपीसीआर टेस्टमध्ये 30 हजार 622 नमुने तपासण्यात आले. यातील 4 हजार 285 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नव्याने 415 नमुने घेण्यात आले. अँटिजेन टेस्टमध्ये एकूण 23 हजार 256 नमुने तपासले. पैकी 1 हजार 986 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
-
तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण (कंसात मृत्यूचा आकडा)
- देवगड 434 (9), - दोडामार्ग 355 (4), - कणकवली 1868 (41), - कुडाळ 1389 (32), - मालवण 531 (17), - सावंतवाडी 824 (43), - वैभववाडी 182 (7), - वेंगुर्ले 546 (10), - जिल्ह्याबाहेरील रुग्ण 20 (1).
-
तालुका निहाय सक्रिय रुग्ण
- देवगड-21, - दोडामार्ग-11, - कणकवली-59, - कुडाळ-53, - मालवण-16, - सावंतवाडी-16, - वैभववाडी-4, - वेंगुर्ले-25 व जिल्ह्याबाहेरील 3 रुग्ण.
संपादन - राहुल पाटील
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.