सिंधुदुर्गात आणखी 5 कोरोना रुग्ण 

coronavirus impact konkan sindhudurg
coronavirus impact konkan sindhudurg

ओरोस (सिंधुदुर्ग )-  जिल्ह्यात आज नव्याने 5 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आज नव्याने 8 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 6 हजार 43 झाली. आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 173 झाली आहे. 

सद्यस्थितीत जिल्ह्यात सक्रिय 183 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांची संख्या 3 एवढी आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली. सावंतवाडी तालुक्‍यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. तर कणकवली तालुक्‍यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत 6 हजार 405 रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 173 झाली आहे. आतापर्यंत 35 हजार 370 आर टी पी सी तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4430 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 25 हजार 306 नमुन्यांची अँटीजन टेस्ट करण्यात आली असून त्यापैकी 2089 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 

तालुकानिहाय पॉझिटीव्ह रुग्ण ः देवगड 441, दोडामार्ग 361, कणकवली 1956, कुडाळ 1446, मालवण 590, सावंतवाडी 844, वैभववाडी 185, वेंगुर्ले 555, जिल्ह्याबाहेरील 27. जिल्ह्यात 183 रूग्ण सक्रिय ः देवगड 6, दोडामार्ग 6, कणकवली 62, कुडाळ 35, मालवण 33, सावंतवाडी 23, वैभववाडी 2, वेंगुर्ले 7, जिल्ह्याबाहेरील 9. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com