नांदगावात यंत्रणा खडबडून जागी, पोलिसही तैनात

पल्लवी सावंत
रविवार, 2 ऑगस्ट 2020

दरम्यान, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत खबरदारी म्हणून रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी येथील तिठा परिसराचा संपूर्ण सर्व्हे केला आहे. ग्रामपंचायतीने परिसरात जंतुनाशकाची फवारणी व जनजागृती केली

नांदगाव (सिंधुदुर्ग) - नांदगाव येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कातील आणखी तीन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे येथील तिठा येथे कोरोना पॉझिटिव्ह एकूण संख्या 4 झाली आहे. दरम्यान, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत खबरदारी म्हणून रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी येथील तिठा परिसराचा संपूर्ण सर्व्हे केला आहे. ग्रामपंचायतीने परिसरात जंतुनाशकाची फवारणी व जनजागृती केली. 

वाचा - कोकणातल्या 'या' चेकपोस्टवर वाहनांच्या लागलेत लांबलचक लांब रांगा....

तिठा येथे स्थानिक मत्स्य विक्रेत्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या संपर्कात असलेल्या हाय रिक्‍समधील व्यक्तींचे स्वॅब घेणे सुरू असून पहिल्या 4 जणांपैकी 2 अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील 5 व्यक्तींचे त्यानंतर 7 जणांचे स्वॅब टेस्टसाठी पाठविले होते. दरम्यान, नवीन रुग्णांच्या संपर्कातील हाय रिस्कमधील शुक्रवारी (ता. 31) पुन्हा 22 जणांचा स्वॅब घेतला असून त्याचाही अहवाल येणे बाकी आहे. 

हेही वाचा - सिंधुदुर्गातील `वेटलँड` आता एका क्लिकवर! वाचा सविस्तर... 

या पार्श्‍वभूमीवर आज पुन्हा तिठा परिसराचा आरोग्य यंत्रणेमार्फत संपूर्ण सर्व्हे केला. यामध्ये येथील आरोग्य केंद्राचे डॉ. रावराणे, आरोग्य सहायक श्री. ठाणेकर, आरोग्यसेविका डिसोजा, आरोग्यसेवक मुसळे, श्री. परब, तसेच आशा सेविका यास्मीना बटवाले, अंशकालीन स्त्री परिचर रचना मोरये आदींनी सर्व्हे केला. कंटेन्मेंट झोन घोषित असल्याने कणकवली पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात ठेवला आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact nandgao sindhudurg district