प्रारंभी कासवगती, पुन्हा सशाचीच चाल, वाचा सिंधुदुर्गची स्थिती काय?

coronavirus impact sindhudurg district
coronavirus impact sindhudurg district

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात 26 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्याला 22 ऑगस्टला 150 दिवस पूर्ण झाले आहेत. या दीडशे दिवसांच्या मुक्कामात अगदी जूनच्या अखेरपर्यंत कासवगतीने कोरोना फैलाव सुरू होता. जुलैमध्ये ही चाल थोडी वेगवान झाली; मात्र ऑगस्टमध्ये थेट सशाच्या चालीचा वेग कोरोनाने घेतला. 150 दिवसांत 932 रुग्ण मिळाले असून 11 हजार 275 चाचण्या झाल्या आहेत; मात्र यातील ऑगस्टच्या 22 दिवसांत तब्बल 558 रुग्ण आढळले असून 4 हजार 954 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. 

पूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोनाने काही दिवसांत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कंबरडे मोडले. विशेषत 22 दिवसांत उग्ररूप धारण केले आहे. त्यामुळे जिल्ह्याची कोरोना बाधित संख्या झपाट्याने 900 च्या पुढे गेली आहे. या 150 दिवसांत 11 हजार 275 चाचण्या घेण्यात आल्या. यातील 932 चाचणी कोरोनाबाधित आल्या आहेत. बाधितांपैकी 494 व्यक्ती कोरोनामुक्त होवून घरी परतल्या. तर 15 जणांचे निधन झाले आहे. सहाव्या कोरोना बाधित व्यक्तीचे निधन झाल्यानंतर तब्बल 36 दिवसांनी सातव्या कोरोना बाधित व्यक्तीचे निधन झाले होते; मात्र ऑगस्टमध्ये यात मोठी वाढ झाली. 

पहिला रुग्ण मार्चमध्ये 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिला रुग्ण 26 मार्चला आढळला. यानंतर 29 एप्रिलला दुसरा रुग्ण मिळाला. मेमध्ये या रुग्णसंख्येत वाढ होत गेली. ती 20 जुलैपर्यंत 279 पर्यंत आली. या कालावधीत जिल्ह्यात 4 हजार 668 कोरोना चाचणी नमूने घेण्यात आले होते. तर 241 रुग्ण बरे होवून घरी परतले होते. 5 व्यक्तीचे निधन झाले होते. 26 मार्च ते 20 जुलै या 117 दिवसांत एकूण करण्यात आलेल्या चाचन्यांमध्ये मिळालेली रुग्ण संख्या 1.6 टक्के एवढी होती. 

जुलैपासून संख्येत वाढ 
1 जुलैपासून जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढीने वेग घेतला. जुलैच्या 31 दिवसात 2 हजार 497 नमूने चाचणी घेण्यात आली. 160 रुग्ण मिळाले. एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात करण्यात आलेल्या एकूण चाचणीची संख्या 6 हजार 321 झाली. बाधित रुग्णसंख्या 374 वर पोहोचली. मृत्यू झालेल्या व्यक्तीची संख्या 6 झाली होती. यात वाढ झाली ती 20 जुलैनंतर. आमदार वैभव नाईक यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय पुढारी बाधित आल्याने ही वाढ झाली होती. 20 ते 31 जुलै या काळात 1 हजार 653 नमूने घेण्यात आले. 195 नवीन रुग्ण मिळाले. 31 व्यक्तिना डिस्चार्ज देण्यात आला. 

ऑगस्टमध्ये हाहाकार 
1 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट हे 150 दिवसांतील शेवटचे 22 दिवस जिल्ह्यात आहाकार माजवीणारे ठरले आहेत. कारण या काळात जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण मिळाले आहेत. दिवसाला जास्तीत जास्त 30 रुग्ण मिळाल्याचे असलेले रेकॉर्ड मोडित निघत ते 130 रुग्ण मिळण्यापर्यंत पोहोचले. या 22 दिवसात नव्याने 4 हजार 954 नमूने घेण्यात आले. त्यातील 558 अहवाल बाधित आले आहेत. तब्बल 7 मृत्यू वाढले आहेत. 

स्थानिकच जास्त बाधित 
विशेष म्हणजे ऑगस्टमध्येच डॉक्‍टर, नर्स, पोलिस, शिक्षक कोरोना बाधित झाले. मुंबईकर यांच्या पेक्षा जास्त संख्यने स्थानिक नागरिक बाधित आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यासाठी ऑगस्ट महिना कोरोना व्हायरस कर्दनकाळ ठरत आहे. रुग्ण वाढण्याचा धोका अधिक वाढत आहे. 21 ला प्राप्त झालेल्या एकूण 185 अहवालातील 130 बाधित अहवाल आले. 57 अहवाल निगेटिव्ह आले. 150 दिवसांत प्रथमच असे घडले. प्राप्त अहवालात निगेटिव्हपेक्षा बाधित अहवाल जास्त आले. 

रूग्ण वाढण्याचा धोका 
गणेश चतुर्थीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढणार याचा अंदाज जिल्हा प्रशासनाला होताच. त्यामुळे प्रशासनाने बेडसंख्या वाढविली. अन्य यंत्राणांची क्षमताही वाढविली होती; मात्र सुमारे दीड लाख चाकरमानी येतील. त्यामुळे हे रुग्ण वाढतील, असे प्रशासनाला वाटले होते; मात्र प्रत्यक्षात जिल्ह्यात 40 हजारच चाकरमानी आले. याचाच अर्थ चाकरमानी आल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या अचानक वाढली नाही. जिल्ह्यात सोशल स्प्रेड सुरू झाल्याने ही संख्या वाढली आहे. जिल्ह्यात आता पोलिस, शिक्षक, शासकीय कर्मचारी, तलाठी, आरोग्य कर्मचारी, डॉक्‍टर, वकील व राजकीय व्यक्ती बाधित होत आहेत. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com