चिंताजनक! नवे 76 बाधित; दोन मृत्यू, संस्थात्मक क्‍वारंटाईनची संख्या 20 हजारावर

विनोद दळवी 
Tuesday, 8 September 2020

परिणामी जिल्ह्याची एकूण बाधित संख्या 1 हजार 909 झाली आहे. यातील 962 रुग्ण सक्रिय राहिले आहेत. या सर्व रुग्णांवर जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आज नव्याने 76 व्यक्तींचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 909 झाली आहे. आणखी 2 व्यक्तींचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 27 झाली आहे. आणखी 52 व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने कोरोनामुक्त संख्या 920 झाली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील नागरी भागातील संस्थात्मक क्‍वारंटाईनमध्ये तब्बल 7 हजार 637 व्यक्ती दाखल झाल्याने जिल्ह्यातील संस्थात्मक क्‍वारंटाईनची संख्या 20 हजार 950 झाली आहे. 

जिल्ह्यात काल (ता. 6) दुपारपर्यंत 1 हजार 833 व्यक्ती कोरोनाबाधित होत्या. त्यानंतर त्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत 699 अहवाल प्राप्त झाले आहेत. या प्राप्त अहवालात 623 निगेटिव्ह अहवाल आले आहेत, तर 76 अहवाल बाधित आले आहेत. परिणामी जिल्ह्याची एकूण बाधित संख्या 1 हजार 909 झाली आहे. यातील 962 रुग्ण सक्रिय राहिले आहेत. या सर्व रुग्णांवर जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

जिल्हा कोरोना चाचणी केंद्राला नव्याने 587 कोरोना नमुने प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कोरोना चाचणीसाठी घेतलेल्या नमुन्यांची संख्या 16 हजार 900 झाली आहे. यातील 16 हजार 722 नमुने अहवाल प्राप्त झाले आहेत. तर 177 अहवाल प्रतीक्षेत राहिले आहेत. नव्याने प्राप्त झालेल्या 699 अहवालात आणखी 623 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे निगेटिव्ह अहवालांची संख्या 14 हजार 814 झाली आहे. तर नव्याने 76 अहवाल बाधित आल्याने आतापर्यंत 1 हजार 909 अहवाल बाधित झाले आहेत.

आणखी 52 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत 920 व्यक्ती ठणठणीत होऊन घरी परतल्या आहेत. तर आतापर्यंत 27 व्यक्तींचे निधन झाले आहे. यात जिल्ह्यातील 26 आणि वास्को गोवा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. परिणामी 962 रुग्ण सक्रिय राहिले आहेत. या सर्व रुग्णांवर जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या संस्थात्मक क्‍वारंटाईनमधील 7 हजार 246 व्यक्ती वाढल्या आहेत. त्यामुळे क्‍वारंटाईन संख्या 20 हजार 950 एवढी झाली आहे.

यातील गाव पातळीवरील संस्थात्मक क्‍वारंटाईनमधील 391 व्यक्ती कमी झाल्या आहेत. त्यामुळे येथील दाखल व्यक्तीची संख्या 8 हजार 887 झाली आहे. नागरी क्षेत्रातील संस्थात्मक क्‍वारंटाईनमध्ये मात्र 7 हजार 246 व्यक्ती वाढल्याने येथील संख्या 12 हजार 63 झाली आहे. जिल्ह्यात 2 मेपासून दाखल झालेल्या व्यक्तीची संख्या 2 लाख 11 हजार 159 झाली आहे. जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 229 कंटेन्मेंट झोन सक्रिय आहेत. रेल्वेने जिल्ह्यात 4 हजार 137 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact sindhudurg district