सिंधुदुर्ग लाॅकडाऊन : काय राहणार बंद,काय सुरू.... वाचा....

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शासन स्तरावर सर्व त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

सिंधुदुर्गनगरी : राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शासन स्तरावर सर्व त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच फैलाव होऊ नये म्हणून गर्दी होणारे कार्यक्रम तसेच गर्दीची ठिकाणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

ही दुकाने 31 मार्च पर्यत बंद

नागरिकांना गर्दी न करण्याचे व घराबाहेर न पडण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. तरी जिल्ह्याील स्वीटमार्ट, चाट भांडार, पानटपरी या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याअनुषंगाने कोरोना विषणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून दिनांक 21 मार्च 2020 रोजीच्या मध्यरात्री 12.00 वाजलेपासून जिल्ह्यातील सर्व अस्थापना व दुकाने दिनांक 31 मार्च 2020 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

हेही वाचा- Coronavirus Impact : वस्त्रोद्योग शटडाउनच्या दिशेने : कामगार चालले आपल्या घरला...

काय वगळले वाचा 

यामधून पुढील अस्थापनांना वगळण्यात आले आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालये, पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना, सर्व बँका, दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या आस्थापना, रस्ते व रेल्वे वाहतूक, अन्न, भाजीपाला व किराणा दुकान, दवाखाने, वैद्यकीय केंद्र व औषधी दुकाने, विद्युत पुरवठा, ऑईल व पेट्रोलियम व उर्जा संसाधने, एलपीजी, घरगुती गॅर पुरवठा करणाऱ्या आस्थापना, प्रसार माध्यमे, मिडीया, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आय.टी. आस्थापना यांना या बंद मधून वगळण्यात आले आहे. या व्यतीरीक्त सर्व अस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

 हेही वाचा-जनावरे घरी आली परंतू हरीभाऊ काय नाय आले....

जिल्हाधिकारी  आदेश
    सदर आदेशाचा भंग करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था, आस्थापना अशवा समुह आपत्ती व्यवस्थापन अधिनीयम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असणार याची दक्षता घ्यावी असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact sindudurg closed kokan marathi news