राजापूर : तालुक्यातील करक-पांगरी विविध कार्यकारी सोसायटीने शासनाच्या शेती कर्जमाफी योजनेत (Agricultural Loan Waiver Scheme) बनावट कागदपत्रे सादर करून १० लाख ८७ हजार रुपयांचा ढपला पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोसायटीच्या संपूर्ण संचालक मंडळासह ९ जणांविरोधात राजापूर पोलिस ठाण्यामध्ये (Rajapur Police Station) गुन्हा दाखल केला आहे.