esakal | लसीसाठी कायपण! शहरातील केंद्रं 'हाऊसफुल्ल'; ग्रामीण भागाकडे नागरिकांची धाव
sakal

बोलून बातमी शोधा

लसीसाठी कायपण! शहरातील केंद्रं 'हाऊसफुल्ल'; ग्रामीण भागाकडे नागरिकांची धाव

लसीसाठी कायपण! शहरातील केंद्रं 'हाऊसफुल्ल'; ग्रामीण भागाकडे नागरिकांची धाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : शहरी भागात 18 ते 44 वयोगटांतील लसीकरणासाठी (covid-19 vaccination) केंद्रांवर गर्दी होत असल्याने शहरी भागातल्या नागरिकांनी ग्रामीण (village people) भागाकडे धाव घेतल्याचे बुधवारी (5) पाहायला मिळाले; मात्र अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात (primary helth center) केवळ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी लस उपलब्ध असल्यामुळे शहरातील ग्रामस्थ नाराज होऊन परत घराकडे आले.

ग्रामीण भागातील लसीकरण केंद्र नोंदणीसाठी संकेतस्थळावर (website) खुले होताच अवघ्या काही सेकंदात जागा संपत असल्याने लसीकरणासाठी प्रयत्न करणारे ग्रामस्थ हतबल झाले आहेत. कमकुवत इंटरनेट (ineternet) आणि नेटवर्कअभावी नोंदणी होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे काही लसी ऑफलाइन (offline) पद्धतीने ठेवण्याची मागणी वाढते आहे.

हेही वाचा: जिल्हाधिकारीपदी नियुक्तीचा आदेश व्हायरल; गुपित फुटले अन्

देशभरात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाची मोहीम 1 मे रोजी सुरू झाली असली तरी लसींच्या उपलब्धतेनुसार 3 मे रोजी प्रत्यक्ष लसीकरण सुरू झाले. शहरी भागातील लसीकरण केंद्रांवर (vaccination center) गर्दी झाल्याने नागरिकांनी लसीकरणासाठी ग्रामीण भागाचा पर्याय निवडला. त्यामुळे मंगळवारी शिरगाव, अलोरे, दादर, अडरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती. स्थानिकांना (local peole) लस न देता शहरातल्या नागरिकांना लस देण्यावर स्थानिकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे काही ठिकाणी लसीकरण उशिराने सुरू झाले; मात्र या गोंधळानंतरही बुधवारी लसीकरण केंद्रांवर शहरी नागरिकांचा ओघ कायम असल्याचे दिसून आले.

चिपळूण तालुक्‍याच्या (chiplun) पूर्व विभागातील लोकांसाठी पिंपळी येथील आरोग्य उपक्रमात लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. तेथे शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे येथे काही काळ गोंधळाची स्थिती होती. स्थानिकांना लसीकरणात प्राधान्य दिल्यानंतर लसीकरण सुरू झाले; मात्र लसीकरणाच्या नोंदणीतून स्थानिकांना सूट मिळावी, अशी मागणी आता वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात लसीकरणाच्या नोंदणीसाठी अडचणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

"18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी नोंदणी आवश्‍यक असल्याने नोंदणी असणाऱ्यांनाच नियमानुसार लस दिली जाते आहे. शासनाच्या आदेशानुसार तालुक्‍यात लसीकरण मोहीम सुरू आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे."

- डॉ. ज्योती यादव, तालुका आरोग्य अधिकारी, चिपळूण

हेही वाचा: प. बंगालमधील पराभव भाजपच्या जिव्हारी

एक नजर...

  • नेटवर्कअभावी नोंदणी होत नसल्याच्या तक्रारी

  • काही लसी ऑफलाइन पद्धतीने ठेवण्याची मागणी

  • शहरी भागातील लसीकरण केंद्रांवर गर्दी

  • लसीकरणासाठी ग्रामीण भाग पर्यायाची निवड

  • शहरातल्या नागरिकांना लस; स्थानिकांचा आक्षेप

  • गोंधळानंतरही बुधवारी शहरी नागरिकांचा ओघ