esakal | सावंतवाडी पालिका भविष्यात एक नंबर ः माजी खासदार राणे

बोलून बातमी शोधा

cricket tournament Inauguration Sawantwadi konkan sindhudurg}

येथील जिमखाना मैदानावर येथील पालिकेतर्फे आयोजित भव्य नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्‌घाटन राणे यांच्या हस्ते झाले.

सावंतवाडी पालिका भविष्यात एक नंबर ः माजी खासदार राणे
sakal_logo
By
रुपेश हिराप

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जिमखाना मैदान व येथील शहराला मोठा इतिहास आहे. आज या मैदानावर तब्बल 20 वर्षांनी होत असलेल्या नगराध्यक्ष चषकाच्या निमित्ताने सर्व पक्षीय नगरसेवक एकत्र आलेत. शहराच्या विकासासाठीही सर्वांनी एकत्र या. अशीच एकत्र विकासात्मक वाटचाल केल्यास भविष्यात ही पालिका राज्यातील एक नंबरची नगरपरिषद ठरेल, असा विश्‍वास भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केला. 

येथील जिमखाना मैदानावर येथील पालिकेतर्फे आयोजित भव्य नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्‌घाटन राणे यांच्या हस्ते झाले. श्रीफळ वाढवून तसेच नाणेफेक करून श्री. राणे यांनी स्पर्धेचा प्रारंभ केला. त्यानंतर तब्बल 20 वर्षानंतर होत असलेल्या या नगराध्यक्ष चषक स्पर्धेला राणे यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राणे यांनी बॅट हातात घेऊन जोरदार फटकेबाजी केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, भाजपचे युवा नेते विशाल परब, आनंद शिरवलकर, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगांवकर, पालिका सभापती सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, पालिका गटनेते राजू बेग, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका दिपाली भालेकर, समृद्धी विरनोडकर, भारती मोरे, शुभांगी सुकी, स्पर्धेचे संयोजक मकरंद तोरसकर, बांदा सरपंच अक्रम खान, नेमळे सरपंच विनोद राऊळ, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, बंटी पुरोहित, ऍड. अनिल निरवडेकर आदी उपस्थित होते. 

राणे म्हणाले, ""नगराध्यक्ष परब हे मल्टी टॅलेंटेड असून ते काहीही करू शकतात. त्यांना जर वाटले असते तर ते ही स्पर्धा राज्यस्तरीयही घेऊ शकले असते; मात्र स्थानिक युवकांना संधी मिळावी यासाठी त्यांनी जिल्हास्तरावर एवढ्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन केले. त्याचा सर्व खेळाडूंनी लाभ घ्यावा. अशातून राज्य व देश पातळीवरचे खेळाडू घडावेत, हे शहर एकविसाव्या शतकातील प्रगतशील शहर होण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. शहरातील राज्यकर्ते, अधिकारी त्यासाठी नक्कीच प्रयत्न करत आहेत.'' 

राजन तेली म्हणाले, ""शहरामध्ये सर्व नगरसेवक सामाजिक कार्यात एकत्र येतात हेच आजच्या स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी उपस्थित शिवसेना नगरसेवकाने दिसून आले. जिमखाना मैदानाला वेगळा दर्जा आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू या मैदानावर खेळून गेले आहेत. त्यामुळे मैदानावर असलेल्या समस्या लवकर मार्गी लावणे गरजेचे आहे. अशा स्पर्धेतून चांगले खेळाडू घडतील आणि त्यासाठी जी-जी मदत लागेल ती राजकारण न करता वेळोवेळी केली जाईल.'' 

सत्ताधारी, विरोधकांचा पाठिंबा 
नगराध्यक्ष परब म्हणाले, ""जवळपास 20 वर्षानंतर पुन्हा एकदा या मैदानावर नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धा होत आहेत. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक सर्व नगरसेवकाने पाठिंबा दर्शवला. मुख्याधिकाऱ्यांनीही या स्पर्धेसाठी होकार दिला. बक्षीस तरतूदही पालिकेच्या फंडातून करण्यात आली. येत्या एक महिन्यात या मैदानावरील समस्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम करणार आहे. पॅव्हेलियन इमारतीचा प्रश्‍न संबंधित मालकी असलेल्या व्यक्तींशी चर्चा करून सोडवला जाईल.'' 

...तर क्रीडा क्षेत्र बळकट 
मुख्याधिकारी जावडेकर म्हणाले, ""कोरोना काळातही क्रीडा क्षेत्राला झळाळी मिळावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. पालिकेने या ठिकाणी होणाऱ्या क्रीडा संकुलासाठी दीड एकर जागा संपादन केली आहे. लवकरच या क्रीडा संकुलामुळे क्रीडा क्षेत्राच्या वाटचालीमध्ये नक्कीच भर पडेल. सर्वांनी खिलाडी वृत्तीने तसेच कोणाचे नियम पाळून खेळ सादर करावा. 

संपादन - राहुल पाटील