esakal | तब्बल 18 गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ; एकाला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

kolkata

तब्बल 18 गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ; एकाला अटक

sakal_logo
By
प्रमोद हर्डीकर

साडवली : गावठी बॉम्ब बाळगल्याप्रकरणी देवरुख नजीकच्या हरपुडे मराठवाडी येथून सुरेश आत्माराम किर्वे (४८) या संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. याच्याकडे ९ हजार रुपये किमतीचे १८ गावठी बॉम्ब सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. गावठी बॉम्ब बेकायदेशीरपणे आपल्या ताब्यात ठेऊन मानवी जीवितास तसेच प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण केला, म्हणून या संशयितावर देवरुख पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भातील फिर्याद आशिष वसंत शेलार, पोहेकॉ दहशदवाद विरोधी पथक यांनी दिली. ही कारवाई दहशदवाद विरोधी पथक व बॉम्ब शोध व नाशक पथक यांच्याकडून संयुक्तरीत्या करण्यात आली आहे.

loading image
go to top