धक्कादायक ; ९० वर्षांच्या वृद्धेवर अत्याचार

crime case in dabhol ratnagiri one person arrested by police in case
crime case in dabhol ratnagiri one person arrested by police in case
Updated on

दाभोळ (रत्नागिरी) : दापोली तालुक्‍यातील एका गावामध्ये एका ९० वर्षीय वृद्धेवर भरदुपारी अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार घडला. दापोली पोलिसांनी या संदर्भात एका संशयिताला अटक केली असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

याबाबत दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्‍यातील एका गावामध्ये १९ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास ९० वर्षीय वृद्धा घरी एकटीच असल्याचा फायदा घेऊन एक अनोळखी इसम घराच्या दरवाजातून आत आला व त्याने दरवाजा लावून घेतला व या वृद्ध महिलेवर अत्याचार केला होता. ही घटना घडली तेव्हा, या वृद्धेची सून त्या वेळी बाहेर गावी होत्या. 

तिला तिची सासू आजारी असल्याची माहिती शेजाऱ्यांनी मोबाईलवरून कळविल्यावर सून गावी परत आली. तेव्हा ही वृद्धा काही खातपित नव्हती. तिच्याजवळ चौकशी केली असता, तिने घडलेला प्रकार सुनेला सांगितला व सदर संशयित खडी मशिनच्या रस्त्याने निघून गेल्याचेही सुनेला सांगितले. सुनेने सदर घटना गावातील प्रतिष्ठितांना सांगितला. त्यानंतर या वृद्धेला खासगी डॉक्‍टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथे त्यांना तपासून औषधे देण्यात आली.

त्यानंतर गावातील काहींनी जवळच असलेल्या एका क्रशरवरील कर्मचाऱ्यांचे मोबाईलमध्ये फोटो काढून आणले होते. ते या वृद्धेला दाखविण्यात आले. या वृद्धेने तिच्यावर अत्याचार केलेल्या व्यक्‍तीचा त्यातील फोटो ओळखला. या व्यक्‍तीची माहिती घेतली असता तो सोहन अमरचंद भिल, (रा. सालेर, पो. घंगरार, जि. चितोडगड, राजस्थान) येथील असल्याचे समजले. 

संतापजनक


दरम्यान,  शुक्रवारी (८) रोजी दापोली पोलिस ठाण्यात या वृद्धेच्या सुनेने संशयित सोहन भिल याच्याविरोधात तक्रार दाखल केली असून या तक्रारीनुसार संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे दापोली तालुक्‍यात संताप व्यक्‍त केला आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ratnagiri food safety raid on fake paneer
Mumbai Goa Highway landslide update
MNS threatens protest in Sudhagad Taluka against the installation of smart meters by Mahavitaran
ANS (Andhashraddha Nirmulan Samiti) and women's organizations in Pen organize 'Vatsavitri te Vatdharitri' campaign for tree plantation
Marathi News Esakal
www.esakal.com