esakal | कुत्र्याचा कामगारावर हल्ला, मालकावर गुन्हा; रत्नागिरीतील घटना

बोलून बातमी शोधा

कुत्र्याचा कामगारावर हल्ला, मालकावर गुन्हा; रत्नागिरीतील घटना

कुत्र्याचा कामगारावर हल्ला, मालकावर गुन्हा; रत्नागिरीतील घटना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : देखभाल करणाऱ्या कामगारावरच रॉटव्हिरल जातीच्या कुत्र्याने हल्ला केल्याने कामगाराचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयित म्हणून मालकावर गुन्हा दाखल झाला आहे. संजय उर्फ बाळा कृष्णा मयेकर (वय 57, रा. कृष्णानंद निवास मुरुगवाडा, भैरी मंदिराजवळ, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना 12 डिसेंबर 2020 ला सकाळी सव्वा नऊच्या सुमारास मुरुगवाडा येथे घडली होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयेकर यांचा रॉटव्हिलर जातीच्या कुत्र्याची देखभाल दिवाकर एकनाथ पाटील (वय 55, रा. पावस, रत्नागिरी) हा कामगार करीत होता. मात्र, कुत्र्याने अचानक पाटील यांच्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. संशयिताने प्राण्यांबाबत हयगयीचे वर्तन व त्यांचा निष्काळजीपणा केला. या प्रकरणी पोलिस हवालदार दीपक जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी सोमवारी (26) ला संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.