रत्नागिरीकरांची सर्तकता! मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न लावला उधळून

'भाईजान मुझे माफ कर दो'; विनंतीनंतर जमावाने महिलेला सोडून दिले
रत्नागिरीकरांची सर्तकता! मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न लावला उधळून
Updated on: 

रत्नागिरी : मिरकरवाडा येथे एका मुलीच्या (mirakawada port) अपहरणाचा प्रयत्न नागरिकांनी उधळून लावला. रिक्षा घेऊन आलेल्या महिलेबाबत (women) नागरिकांना संशय आल्यानंतर तिला रिक्षासह पकडण्यात आले. 'भाईजान मुझे माफ कर दो । मै आप सबसे माफी मांगती हू। आगे से एैसा नही करुंगी ।।' अशी विनवणी केल्यानंतर जमावाने त्या महिलेला जाऊ दिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. (social media) याबाबत तक्रार नसली तरी शहर पोलिस घटनेची माहिती घेत आहेत.

ही महिला लहान मुलीला आमिष दाखवून रिक्षात बसवून पळवून नेण्याच्या प्रयत्नात (crimenews) होती. मात्र, तेथील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या मुलीची महिलेच्या तावडीतून सुटका केली. जमावाने महिलेला चांगलेच धारेवर धरले. महिला हिंदीमध्ये बोलत होती. ती म्हणाली, 'भाईजान मै माफी मागती हू । इन लोगोको समजाओ ।।' त्यानंतर जमावातील काही व्यक्ती म्हणाल्या, हे असे कृत्य करता तुम्ही. तुम्हाला काही वाटत नाही. कोणी सांगितले असे करायला. यापुढे मिरकरवाडेमे आने का नही । काहींनी पोलिसात तक्रार करण्याची धमकी महिलेला दिली, मात्र महिलेने माफी मागितल्यानंतर तिला सोडून देण्यात आले. मुलांना पळविणारी टोळी शहरात सक्रिय आहे काय, असा सवाल उपस्थित होत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यांतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

रत्नागिरीकरांची सर्तकता! मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न लावला उधळून
एक गाव असंही! भागात कोरोनाचा धुमाकूळ पण व्हायरसला वेशीबाहेरच रोखलं

"मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडल्याचा व्हिडिओ आम्ही सोशल मीडियावर पाहिला. अजून कोणी तक्रार केली नसली तरी या प्रकरणाची शहानिशा करत आहोत."

- अनिल लाड, शहर पोलिस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com