
मात्र युवकाविरोधात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
कणकवली (सिंधुदुर्ग) : कोल्हापूर शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पिस्तूल प्रकरणातील गुन्ह्याबाबत कलमठ (ता. कणकवली) येथील युवकास शाहूपुरी पोलिसांनी गुरुवारी सकाळच्या सुमारास ताब्यात घेतले. कलमठ येथील त्या युवकांकडून आपण पिस्तूल घेतले होते, अशी कबुली संशयित आरोपीने दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. शाहूपुरी पोलीस या युवकास घेऊन कोल्हापूरला रवाना झाले आहेत. मात्र युवकाविरोधात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
ताब्यात घेतलेल्या कलमठ येथील युवकाने आपणाला पिस्तूल दिल्याची माहिती कोल्हापूर येथे अटकेत पोलिसांना दिली. त्याच तपासासाठी कलमठच्या युवकाला ताब्यात घेण्यात आल्याचे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले. तसेच चौकशीअंती त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - आजी माजी आमदारांच्या गावात ईव्हीम मशीन पडले बंद -
शाहपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिस्तूल बाळगल्याबाबत सरवडे - राधानगरी येथील तावडे नामक युवकास शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. सध्या त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली असुन घटनेचा तपास शाहपुरीचे पोलीस निरीक्षक करीत आहेत. तावडे याने सदरचे पिस्तूल कोठून आणले याचा तपास सुरु होता. हे पिस्तूल त्याने कलमठ येथील युवकाकडून आणल्याचे तपासात पुढे येत आहे. पोलिसांनी तावडे याला बोलते केले असता, तावडे व कलमठ येथील युवक यांची परस्परांशी चांगली ओळख असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शाहूपुरी पोलिसांचे पथक गुरुवारी सकाळी कणकवलीला पोहोचले पथकात हवालदार सुहास पवार, पोलीस नाईक प्रशांत घोलप होते.
संपादन - स्नेहल कदम