esakal | अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी
sakal

बोलून बातमी शोधा

crime case in konkan accused punishment of 10 years in ratnagiri

आरोपीशी पीडित मुलीची ओळख झाल्यावर त्याने अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिला लग्नाचे आमिष दाखवले. 

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : मुलगी अल्पवयीन आहे, हे माहिती असतानाही लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला विशेष पोक्‍सो न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. सौरभ सुनील पागार (वय २३, रा. पाटगाव, देवरूख, संगमेश्‍वर) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना ४ जानेवारी ते ५ एप्रिल २०१९ या कालावधीत देवरूख येथे घडली होती.

आरोपीशी पीडित मुलीची ओळख झाल्यावर त्याने अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते. त्यातून ती दोन महिन्यांची गरोदर राहिली होती. संशयित बेलाराम ऊर्फ विकी दलाराम देवासी (वय २३, रा. संगमेश्‍वर, मूळ ः राजस्थान) याच्या मदतीने आरोपीने गर्भपाताच्या गोळ्या खरेदी करून गर्भपात घडवून आणला व पुरावा नष्ट केला. या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाइकांनी देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार 
दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध भादवि कलम ३७६ (२) (एन) ३१२, २०१, ३४  गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक अस्मिता पाटील करत होत्या. तपासात पोलिसांनी दोन संशयितांना अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. 

हेही वाचा - गुन्हे दाखल केले, तरीही दुकाने सुरू ठेवणार; रत्नागिरी व्यापारांचा लॉकडाउनला विरोध

या खटल्याचा निकाल सह जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. ए. राऊत यांच्या न्यायालयात झाला. न्यायालयाने आरोपीला भादवि ३७६ (२) (जे) (एन) मध्ये दोषी ठरवून १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड दंड न भरल्या एक वर्षे कारावास, पोक्‍सो कलम ४ मध्ये दोषी ७ वर्षे सक्तमजुरी १० हजार दंड, दंड न भरल्यास १ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली तर आरोपी बेलाराम देवासी याची भादवि कलम ३१२, २०१, ३४ व २४८ (१) मधून निर्दोष सोडण्यात आले आहे. सरकारी पक्षातर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले. विशेष पोक्‍सो न्यायालयाच्या विशेष सहायक सरकारी अभियोक्ता ॲड. मेघना नलावडे यांनी काम पाहिले. तर पैरवी अधिकारी म्हणून देवरुख पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील आयरे यांनी मदत केली.

loading image