एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर हल्ला करणाऱ्याला 7 वर्षे सक्तमजुरी, रत्नागिरीतील घटना

crime case in ratnagiri on girl attack punishment of seven year accused
crime case in ratnagiri on girl attack punishment of seven year accused
Updated on

रत्नागिरी : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर हल्ला करून जखमी करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने ७ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. रोशन भीमदास कदम (वय २१, रा. बौद्धवाडी-माखजन, सध्या वडाळा पूर्व-मुंबई) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना ८ जानेवारी २०१८ ला सकाळी दहाच्या सुमारास घडली होती. आरोपी रोशन हा मुंबईवरून माखजन गावी आला होता. अल्पवयीन मुलगी येत असताना मैत्री जुळवली होती. 

वारंवार भेटून, मोबाईलवरून वेळोवेळी फोन करून मेसेज करत असे यावरुन अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी मुलीला पुन्हा फोन न करण्याबाबत बजावले होते. यावरुन आरोपीने राग मनात धरुन होता. पीडित मुलगी बोलत नाही, याचा मनात राग धरुन आरोपीने अल्पवयीन मुलगी मैत्रीणसह जात असताना तिला रस्त्यात अडवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण तिने त्याच्याशी बोलणे टाळून पुढे चालत गेली. त्यावेळी आरोपीने तिच्या पाठीमागून येऊन काचेची बिअरची रिकामी बाटली डोक्‍यात मारुन कटर कम चाकूने तिच्या मानेवर, गळ्यावर वार करुन गंभीर जखमी केले. तसेच तिला जीवे ठार मारण्याची प्रयत्न केला होता.

या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी माखजन पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी संशयिताविरुद्ध भादवी कलम ३०७, ३४१ अन्वये गुन्हा दाखल केला होता. तपास पोलिस उपनिरीक्षक एम. एम. पाटील करत होते. पोलिसांनी संशयितास अटक करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. (२५) रोजी या खटल्याचा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासले. जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. विनय गांधी यांनी काम पाहिले. न्यायालयाने आरोपीला भादवी कलम ३०७ मध्ये ७ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहामहिने सक्तमजूरी व ३४१ मध्ये ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिन्याची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com