esakal | रत्नागिरीतील सराफाला गंडा; चार लाखांचे सोने घेऊन बंगाली कारागीर पसार
sakal

बोलून बातमी शोधा

crime case in ratnagiri one bengali employee vaned gold from shop

कारागिराशी संपर्क साधण्याचाही जैन यांनी प्रयत्न केला होता; परंतु संपर्क न झाल्यामुळे अखेर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

रत्नागिरीतील सराफाला गंडा; चार लाखांचे सोने घेऊन बंगाली कारागीर पसार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : दागिने बनविण्यासाठी दिलेले ४ लाखांचे सोने घेऊन बंगाली कारागीर फरार झाल्याची घटना रामआळी येथील सराफी दुकानात घडली. पळून गेलेल्या कारागिराविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रलय पात्रा (रा. मुरुगवाडा-रत्नागिरी, मूळ ः पश्‍चिम बंगाल) असे कारागिराचे नाव आहे. ही घटना २५ नोव्हेंबर २०२० ला रामआळी येथील प्रदीप ज्वेलर्स येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदीप कुंदनमल जैन (वय ४०, रा. गाडीतळ, रत्नागिरी) यांनी प्रलय पात्रा यांच्याकडे दागिने बनविण्यासाठी सोने दिले होते.

हेही वाचा - लाखमोलाच्या आंब्याच्या दरावर प्रश्‍नचिन्ह; व्यापारी हवालदिल -

जैन हे नियमितपणे दागिने बनविण्यासाठी देत असत. त्याप्रमाणेच ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्किट, ३४.५०० ग्रॅम वजनाचे लगड स्वरूपातील सोने असे एकूण ८४.५०० ग्रॅम वजनाचे ४ लाखांचे निव्वळ सोने दिले होते. ऑर्डरप्रमाणे दागिने बनवून देऊ, असे पात्राने सांगितले होते; मात्र तीन महिने झाले तरीही तयार केलेले दागिने जैन यांना मिळाले नाही. कारागिराशी संपर्क साधण्याचाही श्री. जैन यांनी प्रयत्न केला होता; परंतु संपर्क न झाल्यामुळे अखेर फसवणूक झाल्याचे श्री. जैन यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून कारागिरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक वांगणेकर करत आहेत.

loading image