फिल्मी स्टाईलने वेंगुर्लेत पोलिसांनी केला त्या गाडीचा पाठलाग अन्....

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

गोवा  एम एच ०२ बीजी १३२७ या नंबरची अल्टो कार भरदाव वेगाने शिरोडाच्या दिशेकडून निघाली अन्...

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) : आज पाहटे सुमारे २.३० वाजताच्या दरम्यान वेंगुर्ला पोलिसांनी येथील मोचेमाड पुलावर गाडीचा पाठलाग करून गोवा बनावटीच्या दारू वाहतूकवर धडक कारवाई केली. यात गोवा बनावटीच्या १ लाख ८३ हजार ३६० रुपयांच्या दारुसहित १ लाख २० हजार ची अल्टो कार मिळून सुमारे ३ लाख ३ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर कारचालक वेंगुर्ला गाडीअड्डा येथील लक्ष्मीप्रसाद सखाराम मांजरेकर (३६) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

 गोवा बनावटीच्या दारूने भरलेली एम एच ०२ बीजी १३२७ या नंबरची अल्टो कार भरदाव वेगाने शिरोडाच्या दिशेकडून वेंगुर्ला दिशेकडे जाताना वेंगुर्ला पोलिसांच्या पेट्रोलिंगच्या टीमला दिसुन आली. यावेळी पोलिसांनी हातातील बॅटरी च्या द्वारे गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता गाडी अजून वेगाने निघून गेली. दरम्यान पोलिसांनी या गाडीचा पाठलाग करून येथील मोचेमाड पुलावर गाडीला थांबवले. यात गोवा बनावटीच्या दारूसहित अल्टो कार व वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा- ब्रेकिंग - रत्नागिरीत सापडले आणखी  ४० नवे कोरोना पॉझिटीव्ह....

वेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कॉन्स्टेबल रंजिता चौहान, पोलीस नाईक सुरेश पाटील, पोलीस नाईक चोडणकर, होमगार्ड गिरप यांनी ही धडक कारवाई केली. या प्रकारणाचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल रंजिता चौहान करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime case in vengurla sindhudurg Govt cracks down on Goa made alcohol transport