esakal | व्यावसायिकासह वडीलांवर चाकु हल्ला; जामसंडेतील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

व्यावसायिकासह वडीलांवर चाकु हल्ला; जामसंडेतील घटना

व्यावसायिकासह वडीलांवर चाकु हल्ला; जामसंडेतील घटना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देवगड : किरकोळ कारणावरून केलेल्या भांडणाचा राग मनात धरून जामसंडे बाजारपेठ येथील एका व्यावसायिकासह त्यांच्या वडीलांवर चाकुने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जामसंडे भटवाडी येथील एका संशयित युवकाविरूद्ध येथील पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. ही घटना शनिवारी (1) रात्री साडेदहाच्या सुमारास जामसंडे बाजारपेठ येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामसंडे बाजारपेठ येथे एका व्यवसायिकाचे दुकान आहे. जामसंडे-भटवाडी येथील संशयित युवक शनिवारी सायंकाळी दुकान बंद असल्याने 7 वाजण्याच्या सुमारास जामसंडे बाजारपेठ येथील संबंधित व्यावसायिकाच्या घरी आंबा बॉक्‍स पॅकींगसाठी लागणारे साहित्य मागण्यासाठी गेला होता. यावेळी संबंधित व्यावसायिकाच्या नातेवाईकांनी दुकानातील साहित्य घरी विक्रीसाठी ठेवत नाही, असे सांगितल्यावर त्याचा राग येवून त्याने त्यांना धक्काबुक्की केली. हाच भांडणाचा राग मनात धरून संशयित पुन्हा रात्री साडेदहाच्या सुमारास मित्रांना घेवून संबंधित व्यावसायिकांच्या घरी गेला. त्यांना बाहेर अंगणात आणून संशयिताने हातातील चाकू व्यावसायिकाच्या पोटात खुपसला. त्यांनी सोडवणूक करुन घेतली. तेथे असलेल्या संबंधित व्यावसायिकाच्या वडीलांवर संशयिताने हल्ला करण्याच्या प्रयत्न केला असता व्यावसायिकाने त्याला रोखले. झटापटीत चाकूचे पाते मोडले. त्याच्या मित्रांनी त्याला बाहेर नेले. जखमी व्यावसायिकाला ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत संबंधित व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. अधिक तपास पोलिस हवालदार एस. डी. कांबळे करीत आहेत.

loading image
go to top