२२ जणांच्या गुंतवणूकीला २४ लाखांचा चुना ; नोकरीच्या अमिषाने तरुणांची फसवणूक

crime news in chiplun ratnagiri one person cheats with skim rupees 24 lakh
crime news in chiplun ratnagiri one person cheats with skim rupees 24 lakh

चिपळूण (रत्नागिरी) : खेर्डीतील २२ जणांकडून फर्मच्या नावाने गुंतवणूक करून घेऊन २३ लाख ७३ हजार रुपयाला फसवणूक करणाऱ्या संशयिताविरुद्ध चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संजय रामभाऊ चव्हाण (रा. खेर्डी, माळेवाडी) असे संशयिताचे नाव आहे. कैलास मारूती मालुसरे (वय. ४०, रा. गोंधळे, देऊळवाडी) याने चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

मालुसरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संजय चव्हाण याने श्री स्वामी समर्थ कृपा असोसिएशनच्या नावे एक फर्म काढली होती. २५ ते ४० वयोगटातील तरुणांना नोकरीचे अमिष त्यांनी दाखवले होते. एका व्यक्तीने पाच लोकांना या संस्थेचे सभासद करण्याची त्याने योजना आणली होती. या संस्थेत अनेक तरूण गुंतल्यानंतर त्याने तरूणांना आयडीची स्कीम आणली. ५०० रुपये भरून एक आयडी घ्यायचा, त्यावर १६० रुपयाचे बोनस त्याने जाहीर केला होता.

डिसेंबर महिन्यापासून ही स्कीम सुरू होती. मालुसरे यांनी या स्कीममध्ये १ लाख ८१ हजार ५०० रुपयाची गुंतवणूक केली होती. तालुक्‍यातील काहींनी या स्कीममध्ये २३ लाख ७३ हजार रुपये गुंतवले. मात्र, या योजनेत कोणताही फायदा झाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मालुसरे यांनी चव्हाण यांच्या विरुद्ध चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरिक्षक सागर चव्हाण करत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com