अठरा गावांचे आरोग्य सांभाळणाऱ्या जैतापूर आरोग्य केंद्रात रिक्त पदांमुळे ससेहोलपट....

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

तालुक्‍यातील अठरा गावांचे आरोग्य सांभाळणाऱ्या जैतापूर आरोग्य केंद्रातील जानशी उपकेंद्रामध्ये आरोग्य सेवक आणि सेविका अशी दोन्ही पदे गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहेत.

राजापूर (रत्नागिरी) : कोरोनाबरोबरच आरोग्य यंत्रणेसमोर आता पावसाळ्यातील संभाव्य साथींचेही संकट आहे. त्यामुळे आरोग्य विभागामध्ये पुरेसे कर्मचारी असणे अपेक्षित आहे; मात्र त्याची कमतरता असल्याने सद्यस्थितीमध्ये कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना अतिरिक्त भार सांभाळताना त्यांची ससेहोलपट होत आहे. 

तालुक्‍यातील अठरा गावांचे आरोग्य सांभाळणाऱ्या जैतापूर आरोग्य केंद्रातील जानशी उपकेंद्रामध्ये आरोग्य सेवक आणि सेविका अशी दोन्ही पदे गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहेत. जैतापूर आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय पदाच्या जागा भरल्या असल्या तरी औषध निर्माता, आरोग्य सहायिका, पुरुष परिचर ही पदे रिक्‍त आहेत. याबाबत विधानसभेमध्ये तारांकित प्रश्‍नही उपस्थित झाला होता. जैतापूर आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात जानशी, अणसुरे, साखर, पडवे आणि डोंगर अशी पाच उपकेंद्रे कार्यरत आहेत.

हेही वाचा - कौतुकास्पद! अधिकाऱ्याची सतर्कता अन् लाभार्थ्यांना मोठा आधार
 

या प्रत्येक उपकेंद्रात एक आरोग्य सेवक व आरोग्य सेविका असणे आवश्‍यक आहे. यांतील तीन पदे रिक्‍त असून जानशी आरोग्य केंद्रातील दोन्ही पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्‍त आहेत. अणसुरे उपकेंद्राच्या आरोग्य सेविका आणि साखर उपकेंद्राचे आरोग्य सवेक यांच्याकडे या आरोग्य केंद्राचा अतिरिक्‍त कारभार दिला आहे. भौगोलिकदृष्ट्या या सर्व गावांचा विचार करता, प्रत्येक गावात पोहोचणे अशक्‍य असल्याचे चित्र आहे. 

हेही वाचा - कोरोनाच्या संकटात वित्त आयोगाची सिंधुदुर्गवर काय झालीय कृपादृष्टी? वाचा

कार्यरत कर्मचाऱ्यांची दमछाक... 
जैतापूर आरोग्य केंद्रामध्ये गेल्या चार महिन्यांमध्ये सुमारे पाच हजारांहून अधिक मुंबईकर चाकरमानी दाखल झाले आहेत. त्यामध्ये जानशी उपकेंद्रामध्ये सुमारे पंधराशेहून अधिक चाकरमान्यांचा समावेश आहे. या चाकरमान्यांसह स्थानिक सुमारे सहा हजार लोकांशी संपर्क साधून त्यांचे आरोग्य सांभाळताना अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: critical condition due to vacancies in Jaitapur Health Cente