कावळा मेला आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला ; परिसरात खळबळ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

दिवसभरात कावळे मेल्याने घबराट पसरली आहे.

गुहागर (रत्नागिरी) : दिवसभरात कावळे मेल्याने तालुक्‍यात घबराट पसरली आहे. शहरातील चंद्रभाग गॅस एजन्सीसमोर सकाळी पहिला मृत कावळा आढळला. त्यानंतर नारळाच्या बागेत एक आणि शृंगारतळीत दोन कावळे मृत झाले. यापैकी नारळ बागेतील कावळा तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

शृंगारतळीतील कावळे कुत्र्यांनी खाल्ल्याने तपासणीसाठी पाठवता आले नाहीत. तर एक कावळा विजेच्या धक्क्याने मृत झाल्याचे निष्पन्न झाले. कोरोनापाठोपाठ देशभरात बर्ड फ्लूची साथ आहे. पक्षी मृत पावत असल्याची माहिती प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे लोकांमध्ये जागरुकता आणि भितीची संमिश्र भावना आहे. सकाळी सीताराम कॉम्प्लेक्‍समधील चंद्रभागा गॅस एजन्सी व भाजप संपर्क कार्यालयाजवळ कावळा मृत होवून पडला. त्याचा फोटो समाज माध्यमांमध्ये पसरल्यावर घबराट निर्माण झाली.

हेही वाचा -  सिंधुुदुर्गातही होणार वन अमृत  प्रकल्प -

दुपारनंतर शृंगारतळी बाजारपेठेतही दोन कावळे मृत झाले. त्यापाठोपाठ शहरातील देवपाट परिसरात हिरवे यांच्या नारळ बागेत एक कावळा तडफडून मेल्याचे शिंपणे करणाऱ्या महिलेने पाहिले. ठराविक अंतराने कावळे मेल्याने तालुक्‍यात भितीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान नगरसेवक समीर घाणेकर आणि बाजारपेठेतील व्यापारी बंधुंनी चंद्रभागा गॅस एजन्सीजवळ कावळा मेल्याचे नगरपंचायतीला कळवले. मुख्याधिकारी कविता बोरकर यांनी ही माहिती आरोग्य खात्याला दिली.

आरोग्य खात्याने तातडीने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र खांबल यांना बोलावले. त्यांनी कावळ्याची तपासणी केली असता सदर कावळा वीजेच्या धक्क्‌याने मृत झाल्याचे उघड झाले. त्यानंतर खांबल यांनी हिरवे यांच्या बागेतील कावळा पाहिला. सदर कावळ्याचा मृत्यूचे निदान न झाल्याने अधिक तपासणीसाठी मृत कावळा चिपळूण येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात पाठविण्यात आला आहे.शृंगारतळी येथ दोन कावळे मेले. मात्र सदर कावळ्यांना कुत्र्यांनी खाल्ल्‌याचे चौकशीअंती स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा - मात्र पक्षात सध्या त्यांचा निवडणुकीपुरता वापर केला जातोय, त्यांची घुसमट आम्ही समजू शकतो

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crow dead in guhagar people fear of bird flu in guhagar ratnagiri