देगाव येथे परप्रांतीय व्यवसायीकावर जमावाचा हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परप्रांतीयावर हल्ला

देगाव येथे परप्रांतीय व्यवसायीकावर जमावाचा हल्ला

दाभोळ - दापोली तालुक्यातील देगाव येथे काल (ता.९) रोजी दुपारी २ वाजणेचे सुमारास उत्तरप्रदेश येथून गावात येऊन गेले अनेक वर्षे व्यवसाय करणाऱ्या गंगासागर शुक्ला व त्यांच्या घरमालकांना मारहाण करून शुक्ला यांच्या घरातील साहित्याचे नुकसान करून त्यांचे घरात असलेले कपडे, काजुबिया ४० जणांच्या जमावाने जाळून टाकून नुकसान केल्याची केल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरा दाखल करण्यात आली असून गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा देत हा हल्ला करण्यात आला हे विशेष असून दापोली तालुक्यासारख्या शांतता प्रिय तालुक्यातील देगाव सारख्या ग्रामीण भागात हा धक्कादायक प्रकार घडला असून यात राजकीय पक्षाचे पदाधिकारी सहभागी असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

देगाव येथील गंगासागर दिवाकर शुक्ला यांनी दापोली पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि, ते त्यांची पत्नी व मुलगा असे देगाव बौध्दवाडीतील येथील मुकुंद मंडपे यांच्या गोठ्यात राहत असून त्यांनी मंडपे यांचे कडून १२ गुंठे जागा विकत घेतली असून तेथे घराचे जोते बांधण्याचे काम सुरु आहे. काल (ता.९) रोजी दुपारी २ वाजणेचे दरम्यान सुजल मंडपे याने शुक्ला यांना फोन करून गावातील काही लोक तुमच्या घराचे जोते तोडत आहेत असे सांगितल्यावर गंगासागर शुक्ला, त्यांची पत्नी व मुकुंद मंडपे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी पोचले. त्यांना पाहून गावातल्या लोकांनी गंगासागर शुक्ला यांना लाथाबुक्याने मारहाण केली, तेव्हा शुक्ला यांनी तेथून पळ काढला असता गावकरी त्यांच्या मागून ते राहत असलेल्या ठिकाणी गेले. शुक्ला यांच्या घरातील तांदूळ, कांदे, बटाटे, यांची नासधूस केली, शुक्ला चारचाकी वाहन उलटून टाकले, शुक्ला यांच्या घरातील कपडे, सुक्या काजू बिया हे वाड्याच्या समोर असलेल्या शेतात डीझेल ओतून जाळून टाकले. शुक्ला व त्यांच्या पत्नी या घरमालक मंडपे यांच्या घराच्या माळ्यावर जाऊन लपले त्यामुळे त्यांचा जीव वाचला, तेव्हा काही लोकांनी घरमालक मुकुंद मंडपे यांनाहि मारहाण केली.

या प्रकरणी गंगासागर शुक्ला यांनी दिनेश म्हाळूनकर, रवींद्र भोसले, प्रदीप भोसले, रमाकांत शिंदे, गुरुनाथ मांडवकर, विश्वास पाथरटकर, सुरेश करंजकर, रवींद्र बामणे, विकास बाईत, प्रभाकर गोलांबडे, गंगाराम बाईत, नागेश जाधव, दिलीप जाधव, अनंत जाधव, अनुराधा भोसले, शानू पाथरटकर, सुनील शिवगण, अशोक कदम, चंद्रकांत बामणे व गावातील अन्य २० जणांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या सर्वाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक निनाद कांबळे करत आहेत. कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देगाव येथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Web Title: Crowd Attack On Foreign Businessmen In Degaon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top