esakal | सलग सुट्ट्यांमुळे दापोलीत पर्यटकांची गर्दी ; रस्ते खुले करताना पोलिसांची दमछाक
sakal

बोलून बातमी शोधा

Crowds of tourists in Dapoli due to consecutive holidays

सलग सुट्टयांमुळे मिनी महाबळेश्वर समजले जाणारे दापोली येथे पर्यटकांनी दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासूनच मोठ्या संख्येने गर्दी करायला सुरुवात केली आहे

सलग सुट्ट्यांमुळे दापोलीत पर्यटकांची गर्दी ; रस्ते खुले करताना पोलिसांची दमछाक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हर्णै : लॉकडाऊन उठल्यानंतर दिवाळीच्या सलग आलेल्या सुट्टीमुळे दापोली तालुका पर्यटकांनी फुलून गेला आहे. परंतु, पर्यटकांच्या वाहनांच्या गर्दीने मात्र बहुतेक परिसरातील रस्तेच तासंतास जाम होऊ लागले आहेत.

पर्यटकांची संख्या कमी होत नाही तोपर्यंत ट्रॅफिक जामचा त्रास संपणार नाही. या हंगामात वाहतूक नियंत्रण कक्षाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे किंवा ग्रामसुरक्षा दलाची तरी नेमणूक होणं गरजेचं आहे अशी स्थानिकांकडून मागणी केली जात आहे.


सलग सुट्टयांमुळे मिनी महाबळेश्वर समजले जाणारे दापोली येथे पर्यटकांनी दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासूनच मोठ्या संख्येने गर्दी करायला सुरुवात केली आहे . पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक या भागातील पर्यटक विशेषतः आजही दापोलीला पसंती देतात. यंदाची दिवाळीची सुट्टी मुलांना कोरोनामुळे शालेय सुट्टी असल्याने सलग १५ दिवस पर्यटकांना यंदा मज्जा करायला मिळाली.

सप्टेंबर, ऑक्टोबरपासूनच आगाऊ नोंदणी केल्यामुळे बहुतेकांकडील पर्यटकांची सुविधा फुल्ल झाली आहे.  येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्यांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत होते. कारण बहुतांशी पर्यटक बहुसंख्येने चारचाकी गाडया तसेच मोठ्या ट्रॅव्हल्स घेऊन आले होते. त्यामुळे मुरुड रस्ता, हर्णै बाजारपेठ गेले कित्येक दिवस वाहनांनी फुल्ल होत आहे. तास, दोनदोन तास ट्रॅफिकमध्ये गावातील ग्रामस्थसुद्धा अडकून पडत होते. एक ते दोन किलोमीटरच्या चार चाकी वाहनांच्या रांगांच्या रांगा लागत आहेत. दोन दिवसांपूर्वी तर तब्बल दोन ते अडीच तास हर्णे नवानगर पासून चोपडे यांचे ओशियन पॅलेस पर्यंत पूर्ण हर्णै बाजारपेठ ट्राफिकने चक्का जाम झाली होती. यावेळी चार ते पाच पोलिस कर्मचारी असूनदेखील ग्रामस्थ व पर्यटक स्वतः गाडीमधून उतरून ट्रॅफिक सोडवत होते. 


छोट्या दुचाकी वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून पिरटेंबी मोहल्ल्या , राणेवाडी, सुतारवाडी, हुसेनपुरा करून थेट शाळेकडून जुन्याबाजारपेठेतून ब्राम्हणवाडीतून मुख्य रस्त्याला बाहेर पडत होते. त्यात ही ट्राफिक सुरळीत करण्यासाठी यावेळी ग्रामसुरक्षा दल देखील नव्हते. त्यामुळे कधीकधी पोलिसांची कुमक कमी असली तरी तीन ते चार पोलिस कर्मचारी ट्रॅफिक कमी करण्यासाठी जीवाचा आटापिटा करत होते. त्यात यावेळी ग्रामसुरक्षा दलाचे जवान तैनात केलेले नव्हते.

हे पण वाचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना झोंबले महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य 

 मूळ ट्रॅफिक  ग्रामपंचायत मच्छीमार्केटच्या समोर मच्छीमार्केटच्या बांधकामासाठी असलेला चिरा व रेती, खडी समान रस्त्याला लागूनच आहे त्यात रस्ता अरुंद आणि हे समान असल्यामुळे एकीकडून एखादा मासळीचा ट्रक यावा आणि दुसरी महामंडळाची गाडी आली की याठिकाणी चक्का जाम होतो. असा प्रकार घडला होता. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या बांधकामाचे समान एका बाजूला करून घ्यावे अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.  

संपादन - धनाजी सुर्वे