esakal | देशातील पहिले लक्झरियस क्रूझ मुंबई-गोवा मार्गावर होणार सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

देशातील पहिले लक्झरियस क्रूझ मुंबई-गोवा मार्गावर होणार सुरु

देशातील पहिले लक्झरियस क्रूझ मुंबई-गोवा मार्गावर होणार सुरु

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : मुंबई - गोवा - मुंबई जलमार्गावर १८ सप्टेंबरपासून क्रूझ सेवा सुरु करण्यात येणार आहे. देशातील हे पहिले लक्झरियस क्रूझ असून त्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे, अशी माहिती अ‍ॅड. विलास पाटणे यांनी दिली.

सिंगापूर, दुबई, हाँगकाँग, करेबियन आदी देशात क्रूझला महत्व आहे. आंतरराष्ट्रीय क्रूझ पर्यटनात क्षेत्रात भारताचा वाटा जेमतेम अर्धा टक्का आहे. देशातील १२ मोठ्या बंदरापैकी मुंबई, गोवा, कोचिन, चैन्नई, न्यू मंगलोर या बंदराचीच क्षमता आहे. सधारणतः भारतात १५८ क्रूझ पर्यटन क्षेत्रात आहेत ही संख्या ७०० पर्यत वाढली तर २.५ लाख रोजगार वाढून पर्यटन क्षेत्रात क्रांती होईल. त्यासाठी पर्यटकांचे आदराने स्वागत करून त्यांच्या सुरक्षिततेची हमी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मुंबई बंदरात ३०० कोटी खर्चाच ४.१५ एकरात क्रूझ टर्मिनल उभ राहिले आहे. भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी) आंतरराष्ट्रीय क्रूझ सेवा देणाऱ्या कोर्डेलिया क्रूझ या खासगी कंपनीशी करार केला आहे.

मुंबईपासून गोवा, कोची, दीव, लक्षद्वीप आणि श्रीलंका अशा चार ठिकाणी पर्यटक क्रूझ सेवा येत्या १८ सप्टेंबरपासून सुरू होईल. जलवाहतुकीद्वारे पर्यटक सेवेत कार्यरत असलेल्या कोर्डेलिया क्रूझ कंपनीशी आयआरसीटीसीने करार केल्याने अनेक पर्यटकांना उच्च दर्जाचा जलवाहतुकीचा अनुभव घेता येणार आहे. सध्या मुंबई - दीव - मुंबई, मुंबई - अ‍ॅट सी - मुंबई, मुंबई - गोवा - मुंबई, कोची - लक्षद्वीप अशा मार्गावर हे जहाज जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांना रेस्टॉरंट, खुले थिएटर, बार, थिएटर, व्यायामशाळा, मुलांसाठी तलाव अशा सुविधा असणार आहेत. पहिल्या टप्प्यात या कंपनीची पहिली सेवा मुंबईमध्ये सुरू होत आहे. देशी पर्यटकांसीठी ती असणार आहे. त्यानंतर मे २०२२ मध्ये हे लक्झरी जहाज तामिळनाडूमधील चेन्नई येथे स्थलांतर होईल. त्यानंतर तेथून ते कोलंबो, गॅले, जाफना व त्रिंकोमाली या श्रीलंकेतील ठिकाणी आंतरराष्ट्रीय प्रवास करणार आहे, असे अ‍ॅड. पाटणे यांनी सांगितले.

कोकणात सुविधांची गरज

कोकणात अशाप्रकारची मोठी क्रूझ येण्यासाठी आवश्यक सुविधांची गरज आहे. रत्नागिरीतील मोठ्या बंदरावर क्रूझसाठीच्या सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. देशी-विदेशी पर्यटकांची कोकणाला पहिली पसंती मिळते. त्यासाठी शासनाकडून यावर लक्ष देणे गरजेच आहे, असे अ‍ॅड. पाटणे यांनी सांगितले.

loading image
go to top