दिलासादायक ! चिपळुणात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85 टक्के 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

शहरात आतापर्यंत 893 कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 801 रुग्ण बरे झाले, तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात 1,328 रुग्ण आढळले असून 1,097 रुग्ण बरे झाले आहेत तर 59 रुग्ण मृत्यू पावले.

चिपळूण ( रत्नागिरी ) - गेल्या महिन्यात शहरासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळत होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे. शहरासह ग्रामीण भागातही खासगी डॉक्‍टरांकडे ताप व कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण कमी प्रमाणात तपासणीला येत आहेत. शहरासह ग्रामीण भागात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85 टक्‍क्‍यांवर पोचले आहे. शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्‍क्‍यांवर गेले आहे. 

शहरात आतापर्यंत 893 कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 801 रुग्ण बरे झाले, तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात 1,328 रुग्ण आढळले असून 1,097 रुग्ण बरे झाले आहेत तर 59 रुग्ण मृत्यू पावले. सध्या शहरात 73 रुग्ण असून ग्रामीण भागात 172 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण तालुक्‍यात 245 रुग्ण असून आतापर्यंत 1,898 रुग्ण बरे झालेत. आतापर्यंत एकूण 78 रुग्ण मृत्यू पावले आहेत.

शहरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.70 राहिले आहे तर ग्रामीण भागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.61 टक्के आहे. दीड महिन्यापूर्वी हीच संख्या 50 ते 60 पर्यंत होती. खासगी डॉक्‍टरांकडेही दिवसाकाठी 10 ते 15 रुग्ण तपासणीला येतात. त्यामध्ये एखाद-दुसरा रुग्ण तापाचा आढळून येत आहे. कोविड सेंटरमधील बेडदेखील ओस पडू लागल्याने परिस्थिती चांगली आहे. आताही नागरिकांनी काटेकोरपणे नियमांचे पालन करणे आवश्‍यक असल्याचे मत तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. 

एक दृष्टिक्षेप.. 

  • शहरात 893 रुग्ण; 801 झाले बरे 
  • ग्रामीण भागात 1,097 रुग्ण झाले बरे 
  • आतापर्यंत एकूण 78 रुग्णांचा मृत्यू 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Cure Rate In Chiplun Is 85 Percent Ratnagiri Marathi News