esakal | असा कर्फ्यू पहिल्यांदाच पाहिला 
sakal

बोलून बातमी शोधा

Curfew Seen For First Time In Life Ratnagiri Marathi News

जनता कर्फ्यूच्या पार्श्‍वभूमीवर येथील नागरिकांना 28 वर्षापूर्वीचा कर्फ्यू आठवला. आयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर संपूर्ण देशात कर्फ्यू लावण्यात आला होता. तेव्हा दंगलीची भिती होती. आता मात्र रोगाच्या भितीने कर्फ्युला नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे. असा कर्फ्यू प्रथमच पाहिल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.

असा कर्फ्यू पहिल्यांदाच पाहिला 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चिपळूण ( रत्नागिरी ) - जनता कर्फ्यूच्या पार्श्‍वभूमीवर येथील नागरिकांना 28 वर्षापूर्वीचा कर्फ्यू आठवला. आयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर संपूर्ण देशात कर्फ्यू लावण्यात आला होता. तेव्हा दंगलीची भिती होती. आता मात्र रोगाच्या भितीने कर्फ्युला नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे. असा कर्फ्यू प्रथमच पाहिल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. 

येथील प्रकाश सावंत म्हणाले, 28 वर्षापूर्वी आयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर देशात दंगली उसळल्या होत्या. दंगली रोखण्यासाठी त्यावेळी संपूर्ण देशात कर्फ्यू लावण्यात आला होता. कर्फ्यू असताना काही प्रमाणात लोक घराबाहेर पडत होते. दैनंदिन कामकाजही सुरू होते. मात्र शंभर टक्के बंदची आयुष्यातील पहिलीच वेळ आहे. लोटेतील विलास चिपळूणकर म्हणाले, एक वर्षापूर्वी लोटे परिसरात गोवंश हत्या झाल्यानंतर दंगल झाली, तेव्हा पोलिसांनी कर्फ्यू लावला होता. माझ्या आयुष्यातील तो पहिला कर्फ्यू मी जवळून पाहिला. तेव्हा दुकाने उघडी होती. लोक घराबाहेर पडत होते. मात्र हा कर्फ्यू भयानकच आहे. 

लियाकत दळवी म्हणाले, चिपळुणात काही वर्षापूर्वी दंगल झाली, तेव्हा चार दिवसासाठी संचारबंदी होती. पोलिसांच्या गाड्या रस्त्यावरून फिरत होत्या. रस्त्यावरून जाताना हातात पिशवी असली तरी पोलिस त्याची चौकशी करायचे. प्लेगची साथ पसरली तेव्हाही कर्फ्यू लावण्यात आला होता. तेव्हाही लोकांमध्ये भिती होती. आता सुद्धा भिती आहे. गांधी होंडाचे मालक नितीन गांधी म्हणाले, लोकांनी रोगाच्या भितीने स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. कोरोना विषाणुळे संपूर्ण जग हादरले आहे. प्रत्येकजण या रोगाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या संकटाचा सामना करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे आवाहन केले त्याला सर्वांनी साथ देताना काहीजण मुर्खपणाचा कळस चढवत आहेत. हा प्रकार थांबला पाहिजे. 

loading image