रत्नागिरीमध्ये 84 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन... कोणती वाचा....

राजेश कळंबटे
Tuesday, 21 July 2020

कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात सध्या 84 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन...

रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या 84 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 19 गावांमध्ये,  दापोली मध्ये 7 गावांमध्ये, खेड मध्ये 23 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 17 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 3 , गुहागर तालुक्यात 6 आणि राजापूर तालुक्यात 3 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

हेही वाचा- साखरप्याच्या पुरुषोत्तम जाधवची कमाल :  पूर्ण स्वदेशी पार्टचा वापर करुन त्याने घरीच बनवला ड्रोन -

 

कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने सोमवारी मौजे फणसोप सडा परिसर, रत्नागिरी मिरकरवाडा, रत्नागिरी पोलीस वसाहत, रत्नागिरी मौजे वाटद खंडाळा, रत्नागिरी आशीर्वाद अर्पाटमेंट माळनाका, रत्नागिरी मौजे नाचणे नरहरवसाहत, रत्नागिरी नर्सिंग हॉस्टेल गोगटे कॉलेज ग्राऊंड शेजारी, रत्नागिरी मयुरेश्वर कॉम्प्लेक्स आयटीआय हॉस्टेल समोर नाचणे, रत्नागिरी मौजे जुवे, रत्नागिरी मौजे जयगड, रत्नागिरी मौजे कुणबीवाडी कसोप, रत्नागिरी मौजे भगवतीनगर भूतेवाडी, रत्नागिरी मौजे शेटयेवाडी शिरगाव, रत्नागिरी सनराईझ रसिडेन्सी आझादनगर मजगाव रोड, रत्नागिरी हे क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

हेही वाचा- गणेशोत्सव तयारी : बाहेरून येणार्‍यांना क्वारंटाईन करण्यावर भर, लवकरच व्हीजन निश्‍चित  : डॉ. इंदुराणी जाखड

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मौजे जेलरोड,रत्नागिरी, मौजे राजिवडा, रत्नागिरी, मारुती मंदीर, रत्नागिरी, चर्मालय, रत्नागिरी, साळवी स्टॉप, रत्नागिरी, उद्यमनगर, रत्नागिरी, शिवाजीनगर, मजगावरोड, रत्नागिरी, मौजे नाचणे समर्थनगर, रत्नागिरी, मौजे गणेशगुळे, रत्नागिरी, मौजे शिरगाव तिवंडेवाडी, रत्नागिरी, मौजे मिरजोळे, रत्नागिरी, मौजे भाट्ये, रत्नागिरी, मौजे कारवांची वाडी, रत्नागिरी, मौजे निवळी, रत्नागिरी, मौजे कोतवडे धामेलेवाडी, रत्नागिरी, मौजे वेळवंड, रत्नागिरी या भागात कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या सीमा पूर्ववत करण्यात आल्या आहेत.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: currently 84 active containment zones in the ratnagiri district