वेंगुर्ला- वायंगणीत अग्नितांडव ; वडील व मुलाचा जागीच मृत्यू

सिलिंडर चा स्फोट होऊन वडील व मुलगा यांचा जागीच मृत्य झाला
vengurla
vengurlasakal
Updated on: 
Summary

सिलिंडर चा स्फोट होऊन वडील व मुलगा यांचा जागीच मृत्य झाला

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी बागायतवाडी येथे सिलिंडर चा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या स्फोटात वसंत गणेश फटनाईक (७०) व गणेश वसंत फटनाईक (२९) या बाप लेकांचा जागीच मृत्यू झाला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी बागायतवाडी येथे राहत्या घरात सिलिंडर चा स्फोट होऊन वडील व मुलगा यांचा जागीच मृत्य झाला आहे. ही घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. वडील वसंत गणेश फटनाईक व मुलगा गणेश वसंत फटनाईक अशी यांची नावे आहेत.

स्फोटाचा मोठा आवाज आल्याने घराच्या पुढील बाजूस असलेल्या याच घरातील कुटुंबातील व्यक्तींनी तसेच शेजाऱ्यांनी धाव घेतली व आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान घटनास्थळी तात्काळ वेंगुर्ला पोलीस, वेंगुर्ला नगरपरिषद, कुडाळ एम आय डी सी अग्निशमन बंब दाखल झाले व आग विझवण्यात यश आले मात्र आग एवढी भयंकर होती की सर्व जाळून खाक झाले होते. वसंत फटनाईक यांची बायको मनिषा वसंत फटनाईक या मासे विक्रीसाठी गेल्याने तिचे प्राण वाचले आहेत. दुपारी उशिरापर्यंत पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा सुरू होता

vengurla
हापूस आंब्याचं उत्पादन यंदा फारच कमी; पाहा व्हिडिओ

दरम्यान घटनास्थळी पोलिस निरीक्षक तानाजी मोरे, तहसीलदार प्रवीण लोकरे, सरपंच सुमन कामत, उपसरपंच हर्षद साळगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, वेंगुर्ला गॅस एजन्सी चे नंदन वेंगुर्लेकर व कर्मचारी, ग्रामसेवक संदीप गवस, शिवसेनेचे नितीन मांजरेकर, तलाठी यांच्यासाहित सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com